Posts

Showing posts from November, 2022

सुरली घाटात रस्त्याचे काम सुरू करा, अन्यथा आंदोलन

Image
सुरली घाटात रस्त्याचे काम सुरू करा, अन्यथा आंदोलन  डी एस देशमुख.  कडेगाव : सुरली घाटाचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पाणी संघर्ष समिती प्रमुख व कडेगाव पलूस मतदारसंघा चे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे अध्यक्ष श्री डी ऐस देशमुख यांनी दिला आहे.  डी एस देशमुख म्हणाले की  कराड विजापूर चार पदरी महामार्ग मधील सुरली घाटाचे काम सुरू होण्याबाबत सहा महिन्यापूर्वी निवेदन देऊन आम्ही पाणी संघर्ष समिती व हिंद केसरी फाऊंडेशन सुरली यांनी घाटात झोपून केले होते.  त्यानंतर घाटातील खड्डे भरायला सुरू केले होते व तात्पुरती मलमपट्टी केली होती. आता त्यापेक्षा दुप्पट खड्डे सुरली घाटात पडले आहेत. तरीही शासनास जाग येत नाही.  दिल्ली पासून गल्ली पर्यत भाजप सत्ता असताना सुरली घाटाचे रुंदीकरण काम तात्काळ सुरू का होत नाही असा सवाल त्यांनी केला आहे.  सर्व सरकार भाजप चे असताना कामे तात्काळ सुरू का होत नाहीत.   कराड विटा महामार्ग मधील सुरली घाटात अरुंद व खड्डेमय रस्ता असल्याने वाहतूक कोंडी होते, व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.