साताराचे खा.श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी सौ.रजनीदेवी पाटील यांचा रक्षाविसर्जन विधी रविवार दि.१४ रोजी कराड येथील वैकुंठधाम येथे शोकाकुल वातावरणात पार पडला.
कराड : प्रतिनिधी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ.रजनीदेवी पाटील यांचा रक्षाविसर्जन विधी रविवार दि.१४ रोजी कराड येथील वैकुंठधाम येथे शोकाकुल वातावरणात पार पडला. या विधीला राजकीय, सामाजिक, सहकार, प्रशासकीय, शैक्षणिक, सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांसह जिल्हाभरातून मोठा जनसमुदाय उपस्थित राहिला होता. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ, रा.स.प.चे नेते महादेव जानकर यांनी रविवारी फोनवरून तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, शिवसेना नेते खा.संजय राऊत, आ.दिपक चव्हाण, आ.मानसिंगराव नाईक, आ.अरूण लाड यांनी निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. आ.बाळासाहेब पाटील, डॉ.अतुल भोसले, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमादार प्रभाकर घार्गे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अनिल देसाई, मदनराव मोहिते, राजेश पाटील, हिंदुराव पाटील, हर्षद कदम, इंग्रजीत गुजर आदींनी उपस्थित राहून श्रद्धांज