सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला.. कडेगाव तालुक्यातील घटना.. कडेगाव तालुक्यातील येरळा नदी काठी असलेले वडियेरायबाग गावकरी उपोषणाला बसले असून आपल्या मागण्या मान्य जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गावची एकूण लोकसंख्या 5 ते 6 हजार एवढी आहे दरम्यान सदर गाव क्षेत्रफळाच्या दृष्ठिने पसरलेले आहे गावातील बरेच लोक शेतामध्ये वस्ती करून राहिले आहेत प्रामुख्याने भगतमळा, जगताप मळा , नलवडे मळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोक वास्तव्यास आहेत दरम्यान ह्या प्रत्येक वस्तीवर साधारणपणे हजार ते दीड हजार लोक राहतात,मात्र गावातून ह्या वस्तीकडे जाण्यासाठी पक्के रस्ते अजूनही बनवलेले नाहीत तर पावसाळ्यात ह्या वस्त्यांचा गावापासून संपर्क तुटतो यामुळे गावामध्ये माध्यमिक शिक्षण, आठवडे बाजार याशिवाय वैध्यकीय सेवा घेण्यासाठी लोकांना येणे अशक्य होत आहे तर वैध्यकीय सेवेअभावी बऱ्याच लोकांना मोठी हानी सुद्धा झाली आहे गेली 8 ते 10 वर्षे झाली गावातील नागरिक बांधकाम विभाग, प्रशासन किंवा स्थानिक नेतेमंडळी यांना निवेदने देत आहेत वारंवार सांगत आहेत मात्र रस्त्य...