सावकार डोलत आला अन शेतकरी भुकेने मेला...!

कडेगाव तालुक्यातील सावकारकीची परिस्थिती पाहता हे वाक्य तंतोतंत जुळत आहे.. खासगी सावकार मोठमोठ्याल्या गाड्या घेऊन बंगले बांधून आहेत एवढेच काय तर काही सावकार तर राजकीय पटलावर बसले आहेत जस की मोठे शहनशाह बनून कुठला तर गड जिंकल्यासारखे..! मात्र खऱ्या अर्थाने सांगायचं तर हरामचा पैसा घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करून हे लोक ऐशो आरामची जिंदगी जगत आहेत.. कुठेतरी शाळेत असतानाची "भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत" ही प्रतिज्ञा आज आठवते भारत हा कृषिप्रधान देश आहे , आणि आपल्या शेतकऱ्याला तर जगाचा पोशिंदा म्हटले जाते मात्र हा जगाचा पोशिंदा सावकारकीच्या विळख्यात अडकला आहे हे सावकार मंडळी व्याजाच्या नावावर गोरगरीब शेतकऱ्याची पिळवणूक करत आहेत दरम्यान कडेगाव तालुक्यात अवैद्य बेकायदा सावकारी मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे दिसत आहे पण कडेगाव पोलीस ठाण्याला याचं पडलंय काय का ते सावकारांना पाठीशी घालत आहेत ? तसं बघायला गेले तर प्रशासनातील बऱ्याच अधिकाऱ्यांचे आई-वडील शेतकरी आहेत जर एखाद्या श...