सावकार डोलत आला अन शेतकरी भुकेने मेला...!

कडेगाव तालुक्यातील सावकारकीची परिस्थिती पाहता हे वाक्य तंतोतंत जुळत आहे..
खासगी सावकार मोठमोठ्याल्या गाड्या घेऊन बंगले बांधून आहेत एवढेच काय तर काही सावकार तर राजकीय पटलावर बसले आहेत जस की मोठे शहनशाह बनून कुठला  तर गड जिंकल्यासारखे..! मात्र खऱ्या अर्थाने सांगायचं तर हरामचा  पैसा  घेऊन  शेतकऱ्यांची  पिळवणूक  करून  हे लोक ऐशो आरामची जिंदगी जगत आहेत.. कुठेतरी शाळेत असतानाची "भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत" ही प्रतिज्ञा आज आठवते  भारत हा कृषिप्रधान देश आहे , आणि आपल्या शेतकऱ्याला तर जगाचा पोशिंदा म्हटले जाते  मात्र हा जगाचा पोशिंदा सावकारकीच्या विळख्यात अडकला आहे  हे सावकार मंडळी व्याजाच्या नावावर गोरगरीब शेतकऱ्याची पिळवणूक करत आहेत  दरम्यान कडेगाव तालुक्यात  अवैद्य बेकायदा सावकारी  मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे दिसत आहे  पण कडेगाव पोलीस ठाण्याला याचं पडलंय काय  का ते सावकारांना पाठीशी घालत आहेत ? तसं बघायला गेले तर  प्रशासनातील बऱ्याच अधिकाऱ्यांचे आई-वडील शेतकरी आहेत जर एखाद्या शेतकऱ्यावरती अन्याय होत असेल  तर त्या अधिकाऱ्यांना आपल्या आई-वडिलांची आठवण येत असेल का ओ..? असो..! कडेगाव तालुक्यात सध्या अवैध सावकारांनी शेतकऱ्यांना पिळून काढले आहे .. पैसे दे अन्यथा  जीवे मारण्याचा धमक्या दिल्याचे प्रकारे घडले आहेत काही दिवसापूर्वीच कडेगाव तालुक्यात असा प्रकार निदर्शनास आला आहे  एकीकडे कोरोनामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्याकडे अडकले असताना हे अवैध सावकार मात्र  आपला व्याजाचा पैसा शेतकऱ्यांकडून घेताना  कोणतीही  दयामाया दाखवत नाहीत .. व्याजाच्या पैशाबरोबरच मुदत खरेदी असो  किंवा जमिनीलुबाडणे  असे प्रकारे आता पहायला मिळू लागले आहेत .. दरम्यान लोकप्रतिनिधीही यावरती मूग गिळून आहेत .. कारण सावकारच लोकप्रतिनिधींचे जवळचे कार्यकर्ते जे झालेत  अहो पण माझी त्या लोकप्रतिनिधींना ही विनंती आहे उद्या मतदान मागताना  तुम्हाला त्या सावकारांच्या पेक्षा शेतकरी बांधव का आठवतात ओ..? खऱ्या अर्थाने कडेगाव तालुक्यात जे जे अवैद्य सावकार आहेत  त्यांची प्रॉपर्टी नेमकी किती आहे ? याची चौकशी व्हायला हवी  म्हणजे होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी .. दरम्यान कडेगाव पोलीस ठाण्याने याबाबत  आक्रमक पवित्रा घेणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतय.. सावकारांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करून जबरदस्तीने पैसे उकळणे  योग्य आहे का...?कडेगाव तालुक्यात जे शेतकरी  सावकारकीने त्रस्त आहेत त्यांनी आत्ता रस्त्यावर उतरणे  गरजेचे  आहे...चला  तर मग आपणही लढू  आणि दाखवून  देऊ की आम्ही शांत  आहे याचा  अर्थ नामर्द नाही..

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर