रेल्वे विभागाचा हा कसला बेजबाबदारपणा ....!

रेल्वे विभागाचा हा कसला बेजबाबदारपणा ....

एकीकडे  रेल्वे रूळ खचून  अपघात  होतानाच्या घटना  काय  नवीन  नाहित मात्र हे अपघात  होतात कशामुळे...?
हो त्याला कारण  आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव टकले  येथील  रेल्वे दुहेरीकरणाच्या बॅलेन्स वर्कचे काम  चालू  आहे त्यानुसार भरावा  टाकण्यात आला आहे मात्र बऱ्याच  ठिकाणी  मुर्माच्या नावाखाली संबंधित कॉन्ट्रॅक्टर कंपनीकडून  माती टाकण्यात आली आहे  रेल्वेची  अधिकारी  याला सामील असल्याची चर्चा चालू  असतानाच  रेल्वे प्रशासनाचा  आणखी  एख मुजोरपणा  समोर  आला आहे
एकीकडे माती टाकून कामाची  माती केल्याचा प्रकार घडला  असताना सदर कामाची  चौकशी  करण्यात यावी यासंदर्भातचे  निवेदन वंचित बहुजन  आघाडीकडून सातारा रेल्वे विभागाच्या संबंधित अभियांत्रिकी विभागात  देण्यासाठी  गेले असता पत्रकारांच्या उपस्थितीतही हे निवेदन स्वीकारण्यात आले  नाही याउलट  तिथे उपस्थिती कर्मचाऱ्याने सिनियर सेक्शन इंजिनियर  बळवंत कुमार  यांना फोन लावत  सदर निवेदनाची कल्पना दिली त्यानंतर दूरध्वनी वरून  बळवंत कुमार यांनी  हे निवेदन स्वीकारू नये  असे सांगितले मात्र वंचित बहुजन आघाडी आणि पत्रकारांच्या रेट्यामुळे  श्रीनिवास साहेब यांना फोन लावल्यामुळे  अखेर हे निवेदन स्वीकारण्यात आले
 कामामध्ये गलतानपणा असल्यामुळेच  बळवंत कुमार यांनी कदाचित  हे निवेदन स्वीकारू नये असे सांगितले  असावे त्यामुळे रेल्वे विभागाचा आणखीन एक मुजोरपणा  समोर आला आहे 
 तर सदर कामाच्या गलतान कारभार संदर्भात वंचित बहुजन आघाडी तसेच सामाजिक कार्यकर्ते  यांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेऊन सदर प्रकाराची सखोल चौकशी व्हावी या संदर्भाची निवेदनी देणार आहेत त्याचबरोबर जेपी इन्फ्रा कंपनी  आणि बळवंत कुमार  यांची देखील चौकशी करण्याची मागणी  मुख्यमंत्र्यांपुढे करण्यात येणार असल्याची माहिती  वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव शरद गाडे  यांनी दिली आहे

Comments

Popular posts from this blog

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर

"पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायतीमध्ये पत्रकारांचा सन्मान"