Posts

Showing posts from July, 2024

सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणीच्या बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महत्त्वपूर्ण सूचक निर्देश

Image
केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह यांनी विविध सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी एजन्सींच्या प्रमुखांसोबत देशाच्या सुरक्षा आव्हानांना सामोरे जाणाऱ्या आसूचना ब्यूरो (IB) च्या Multi Agency Centre (MAC) च्या कार्यपद्धतीची पुनरावलोकन करण्यासाठी आज नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, MAC फ्रेमवर्क त्याच्या पोहोच आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी मोठ्या तांत्रिक आणि ऑपरेशनल सुधारणा लागू करण्यास तयार आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी देशातील उदयोन्मुख सुरक्षा धोक्यांच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दहशतवादी नेटवर्क आणि त्यांच्या सहाय्यक इको-सिस्टमला संपवण्यासाठी सर्व एजन्सींच्या अधिक समन्वयावर जोर दिला. गृहमंत्री यांनी यावर भर दिला की, MAC ला अंतिम प्रतिसादकर्त्यांसह विविध हितधारकांमध्ये सक्रिय आणि रिअल-टाइम कार्य करण्यायोग्य माहिती सामायिक करण्यासाठी 24X7 काम करत राहावे. गृहमंत्री यांनी राष्ट्रीय सुरक्षेत सहभागी सर्व एजन्सींकडून तरुण, तांत्रिकदृष्ट्या कुशल आणि उत्साही अधिकाऱ्यांची एक टीम गठित करण्यावर जोर दि

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

Image
व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला. ६ जणांविरुद्ध गुन्हा : धारदार शस्त्रांचा वापर.  कडेगांव: प्रतिनिधी         मटका व्यवसायासाठी दिलेल्या पैशाचे व्याज आणि मुद्दल रक्कम परतन न दिल्यामुळे खाजगी सावकारी करणाऱ्या टोळी ने कडेगांव येथील तीन युवकांवर लोखंडी रॉड, तलवार व गुप्तीने गंभीर जखमी करत बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली आहे. याप्रकरणी खाजगी सावकार सुधीर प्रकाश फडतरे, शुभम जितेंद्र यादव, शुभम सुहास यादव, रा. कडेपूर राहुल मोहन चन्ने रा.कडेगांव राम उर्फ आशुतोष मदने, सुरज मोहिते रा. हिंगणगाव खुर्द  या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.         याबाबत अधिक माहिती अशी की ही घटना सोमवार दिनांक ८ जुलै रोजी दुपारी २ च्या सुमारास कडेगाव शहरातील कराड विटा महामार्गालगत ८ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली. यावेळी अरबाज अस्लम तांबोळी यांचे वडील अस्लम तांबोळी यांना कडेपूर येथील खाजगी सावकार व मटका व्यावसायिक सुधीर फडतरे यांनी स्वतःचा मटका व्यवसाय चालवण्यासाठी ०१ लाख रुपये दिले होते. अस्लम तांबोळी यांनी मटक्याचा ध