व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

६ जणांविरुद्ध गुन्हा : धारदार शस्त्रांचा वापर.


 कडेगांव: प्रतिनिधी 

       मटका व्यवसायासाठी दिलेल्या पैशाचे व्याज आणि मुद्दल रक्कम परतन न दिल्यामुळे खाजगी सावकारी करणाऱ्या टोळी ने कडेगांव येथील तीन युवकांवर लोखंडी रॉड, तलवार व गुप्तीने गंभीर जखमी करत बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली आहे. याप्रकरणी खाजगी सावकार सुधीर प्रकाश फडतरे, शुभम जितेंद्र यादव, शुभम सुहास यादव, रा. कडेपूर राहुल मोहन चन्ने रा.कडेगांव राम उर्फ आशुतोष मदने, सुरज मोहिते रा. हिंगणगाव खुर्द  या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


        याबाबत अधिक माहिती अशी की ही घटना सोमवार दिनांक ८ जुलै रोजी दुपारी २ च्या सुमारास कडेगाव शहरातील कराड विटा महामार्गालगत ८ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली. यावेळी अरबाज अस्लम तांबोळी यांचे वडील अस्लम तांबोळी यांना कडेपूर येथील खाजगी सावकार व मटका व्यावसायिक सुधीर फडतरे यांनी स्वतःचा मटका व्यवसाय चालवण्यासाठी ०१ लाख रुपये दिले होते. अस्लम तांबोळी यांनी मटक्याचा धंदा बंद केल्या नंतर मटक्या व्यवसायातील ९० हजार देणे बाकी होते. त्या मुद्दलीचे मासिक व्याज अस्लम तांबोळी हे प्रत्येक महिन्याला देत होते. दोन ते तीन महिन्याचे व्याज न दिल्यामुळे खाजगी सावकार सुधीर फडतरे यांनी आपल्या साथीदारांसह अरबाज तांबोळी याला सोमावरी कडेगाव येथील स्टँड चौकामध्ये मारहाण केली होती. त्याची तक्रार देण्यासाठी अरबाज तांबोळी व असलम तांबोळी हे पोलीस स्टेशनमध्ये गेले असता. अरबाज याचा लहान भाऊ कराड विटा रोडवरील साई चाईनीज समोर आपल्या मित्रांसोबत बसला होता. तुझ्या वडिलांना व भावाला माझ्या विरोधात खाजगी सावकारी व मटक्याची तक्रार मागे घ्यायला सांग नाहीं तर त्यांना सोडणार नाहीं अशी धमकी दिली. आरबाज त्यांची समजूत काढत असताना सुधीर फडतरे यांच्या थार गाडीतील ठेवलेल्या तलवार, गुप्ती, व लोखंडी रॉड ने
 सुधीर फडतरे यांचे साथीदार राहुल चन्ने याने तलवारीने सोहेल मोहीद्दीन मुल्ला याचे उजव्या हाताचे पोटरीवर मारुन जखमी केले विजय उर्फबबलु शिवाजी पवार यांच्या डावे हाताचे कोपराजवळ अशुतोष मदने याने गुप्तीने मारुन जखमी केले, शुभम यादव याने लोखंडी रॉडने निहाल अस्लम तांबोळी याचे पाठीवर मारुन जखमी केले तसेच सुधीर फडतरेयाने शुभम यादव याचे कडुन लोखंडी रॉड घेवुन निहाल याचे बरगडी व मांडी वर मारहाण करुन गंभीर जखमी केले तसेच जिल्हाधिकारी यांचे बंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे.
          याप्रकरणी ६ जनांवर भा.न्या.सं.२०२३ अन्वये १८९(२),१९१(२),१९१(३),१९०,११८(१),३५२,३५१(२) व  श.अधि.नि.१९५९ अन्वये ४,२५, महाराष्ट्र सावकारी अधि.नि. २०१४ अन्वये ३,९, महा.पो.अधि.नि.अन्वये १३५ रात्री गून्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पो.हव. मिनीनाथ माने करीत आहेत.



Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर