कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर
कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना भारतीय जनता पार्टी कडून अधिकृत उमेदवारी जाहीर कडेगाव पलूस मतदारसंघ हा चर्चेचा मतदार संघ आहे याच मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती धर्मामुळे ही जागा शिवसेनेला सुटली होती यामुळे माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांचे पारंपारिक विरोधक असलेले देशमुख कुटुंबीय यांनी या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज भरलेला नव्हता त्यामुळे मागील निवडणूक तशी एकतर्फी झाली होती असे म्हणणे वावगे ठरणार नाही मात्र विशेष म्हणजे मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असलेल्या संजय विभुते यांच्यापेक्षा नोटाचा पर्याय बऱ्याच मतदारांनी अवलंबला होता, जवळपास वीस हजार एवढे मताधिक्य नोटाला पडले होते तर आमदार विश्वजीत कदम यांना विक्रमी मतदान पडून ते महाराष्ट्रात विक्रमी मतांनी निवडून आलेले उमेदवार ठरले होते दरम्यान आता होणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पार्टी कडून असलेले संग्राम देशमुख यांना अधिकृत उमेदवारी मिळाली असून यामुळे काटे की टक्कर होणार हे मात्र नक्की आहे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना स