शेतकऱ्यांना आता कर्जमाफी द्या,तडसर सोसायटीने कर्ज वसुली थांबविण्याचा राज्यातील पहिली ठराव घेतला

शेतकऱ्यांना आता कर्जमाफी द्या,तडसर सोसायटीने कर्ज वसुली थांबविण्याचा राज्यातील पहिली ठराव घेतला चेअरमन प्रविण पवार यांची माहिती कडेगाव : प्रतिनिधी सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे ऊसतोडणी सुरू आहे. तर बहुतांश ऊसाची बिले सोसायटीत आली आहेत परंतु विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली आहे त्यानी आपल्या जाहिरनाम्यात कर्ज माफीची घोषणा केली होती कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत. आपण कर्ज भरले व कर्जमाफी झाली तर आपले पैसे वाया जातील म्हनून तडसर ता.कडेगाव सेवा सहकारी सोसायटीने पिक कर्ज वसुली थांबण्याचा निर्णय मासिक सभेत घेतला आहे सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रविण पवार होते.असा ठराव घेणारी तडसर सोसायटी हि राज्यातील पहिली सोसायटी आहे. यावेळी बोलताना चेअरमन प्रविण पवार म्हणाले की खरिपातील शेतकऱ्यांचा शेतीमाल घरी येणे चालू झाल्यामुळे बँकांनीसुद्धा आपली कर्ज वसुली सुरू केली आहे. पण, शेतकरी मात्र कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी तसेच विरो...