शेतकऱ्यांना आता कर्जमाफी द्या,तडसर सोसायटीने कर्ज वसुली थांबविण्याचा राज्यातील पहिली ठराव घेतला

शेतकऱ्यांना आता कर्जमाफी द्या,तडसर सोसायटीने कर्ज वसुली थांबविण्याचा राज्यातील पहिली ठराव घेतला 
चेअरमन प्रविण पवार यांची माहिती 

  कडेगाव : प्रतिनिधी 
       सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे ऊसतोडणी सुरू आहे. तर बहुतांश ऊसाची बिले सोसायटीत आली आहेत परंतु विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली आहे त्यानी आपल्या जाहिरनाम्यात कर्ज  माफीची घोषणा केली होती कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत. आपण कर्ज भरले व कर्जमाफी झाली तर आपले पैसे वाया जातील म्हनून तडसर ता.कडेगाव  सेवा सहकारी सोसायटीने पिक कर्ज वसुली थांबण्याचा निर्णय मासिक सभेत घेतला आहे सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रविण पवार होते.असा ठराव घेणारी तडसर सोसायटी हि राज्यातील पहिली सोसायटी आहे.

यावेळी बोलताना चेअरमन प्रविण पवार म्हणाले की खरिपातील शेतकऱ्यांचा शेतीमाल घरी येणे चालू झाल्यामुळे बँकांनीसुद्धा आपली कर्ज  वसुली सुरू केली आहे. पण, शेतकरी मात्र कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी तसेच विरोधकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते तसे जाहिरनाम्यात लेखी वचन दिले होते निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करीत आहेत.
          कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत. आपण कर्ज भरले व कर्जमाफी झाली तर आपले पैसे वाया जातील, असे शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली असून शेतकरी कर्जमाफी होईल या आशेने वाट पाहत आहेत. याआधी महाविकास आघाडीने २०१९ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती.तशाच प्रकारच्या कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आता नव्या सरकारकडून आहे.
            याआधी २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना तसेच २०१९ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना, आदी योजना शासनाकडून राबविल्या गेल्या. ज्याचा लाभ शेतकऱ्यांना काही प्रमाणात झाला. पण आजही अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत. असे अनेक शेतकरी आहेत की जे कुठल्याही योजनेमध्ये बसले नाहीत व अजूनही थकीत आहेत. अशा शेतकऱ्यांनासुद्धा यावेळी कर्जमाफी केली तर त्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. 
             आतापर्यंतची कर्जमाफी ही केवळ थकीत कर्जदारांना झाली. नियमित कर्जदारांना मात्र कर्जमाफीचा कुठलाही लाभ झाला नाही . मागे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांचे अनुदान मिळणार होते, काही शेतकऱ्यांना ते मिळालेसुद्धा. परंतु अजूनही बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. म्हणजेच कर्जमाफीची योजना राबविताना शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा निश्चितच त्या कर्जमाफीमध्ये सहभागी करून घ्यावयास हवे. नाहीतर चुकीचा संदेश नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जाईल व यानंतर कोणीही नियमित कर्ज भरणार नाही. परिणामी, सोसायटीची अवस्था बिकट होईल. सततची नापिकी तसेच शेतमालाला नसलेला भाव, आदी कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेती हा आतबट्ट्याचा विषय झाला आहे. शासनाने कर्जमाफी केली तर निश्चितच अशा शेतकऱ्यांना लाभ होईल.
     यावेळी व्हा . चेअरमन सुनिल पवार संचालक राजेंद्र पाटील,संजय पवार, अनुपकुमार पवार, हिंदुराव जाधव,संतोष जाधव , रुक्मिणी पवार,लिला पवार,किरण पवार, संतोष पवार, व्यंकट होलमुखे, महादेव गुरव उपस्थित होते.



सरसकट कर्जमाफी निर्णय लवकर घ्यावा  !

 थकीत कर्जदार शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळेल व शेतीचा गाडा पुन्हा सुरळीत होऊन काही प्रमाणात रुळावर येऊ शकतो. एकीकडे शासन मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करते. पण, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना शासन लवकर निर्णय घेत नाही शासनाने सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तर लाडक्या बहिणींप्रमाणेच शेतकरीसुद्धा शासनाचा लाडका होईल, त्यामुळे सरकारने सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्यास ती मोठी मदत होईल
      

Comments

Popular posts from this blog

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर

रेल्वे विभागाचा हा कसला बेजबाबदारपणा ....!

"पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायतीमध्ये पत्रकारांचा सन्मान"