रेल्वे विभागाचा हा कसला बेजबाबदारपणा ....!

रेल्वे विभागाचा हा कसला बेजबाबदारपणा .... एकीकडे रेल्वे रूळ खचून अपघात होतानाच्या घटना काय नवीन नाहित मात्र हे अपघात होतात कशामुळे...? हो त्याला कारण आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव टकले येथील रेल्वे दुहेरीकरणाच्या बॅलेन्स वर्कचे काम चालू आहे त्यानुसार भरावा टाकण्यात आला आहे मात्र बऱ्याच ठिकाणी मुर्माच्या नावाखाली संबंधित कॉन्ट्रॅक्टर कंपनीकडून माती टाकण्यात आली आहे रेल्वेची अधिकारी याला सामील असल्याची चर्चा चालू असतानाच रेल्वे प्रशासनाचा आणखी एख मुजोरपणा समोर आला आहे एकीकडे माती टाकून कामाची माती केल्याचा प्रकार घडला असताना सदर कामाची चौकशी करण्यात यावी यासंदर्भातचे निवेदन वंचित बहुजन आघाडीकडून सातारा रेल्वे विभागाच्या संबंधित अभियांत्रिकी विभागात देण्यासाठी गेले असता पत्रकारांच्या उपस्थितीतही हे निवेदन स्वीकारण्यात आले नाही याउलट ...