कराड : प्रतिनिधी
नवीन पुलासाठी जुन्या पुलाचा का बळी ?
         कराड विटा हायवे चे काम सुरु असून कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे काम चालू झाले आहे. या पुलाच्या कामाला कोणताही अडथळा अथवा अपघात होऊ नये म्हणुन प्रशासनाने जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे असे कराडमधील नागरिकांना समजले. परंतु नवीन पुलावर वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याची माहिती राष्ट्रीय रस्ते विकास मंडळातील अधिकाराच्या लक्ष्यात आणून देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने या कामाच्या ठिकाणी जमा झाले होते. या वेळी कराड नगर पालिकेचे नगरसेवक सौरभ पाटील, अनिल घराळ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी व कराडमधील नागरिक उपस्थित होते. नवीन पुलावरून जर सर्व वाहतूक वळवली तर या पुलावर ट्राफिक जाम समश्या निर्माण होण्याची शक्यता आहे असे नागरिकाने यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच जुना पूल पडणार असल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती. तो पडू नये अशी विनंती करण्यात आली. या रस्त्याला कोणताही टोल नाका बसवू नये अशीही विनंती विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासन घेईल. व जुना पूल पडला जाणार नाही अशी माहिती या वेळी देण्यात आली .


TIME LIVE NEWS
कराड 

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर