राज्यातील 92 नगर परिषदा, 4 नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
17 जिल्ह्यांमधील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींची निवडणूक स्थगित करण्यात आलीय. राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय यासंदर्भातचे पत्र निवडणूक आयोगाने पुणे, सातारा, सांगली. सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने दि. 8 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2022 दिला होता.
सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक 19756/2021 ची सुनावणी 12 जुलै 2022 रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी 19 जुलै 2022 रोजी ठेवलेली आहे.पुणे, सातारा, सांगली. सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा या 17 जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार होत्या.
Comments
Post a Comment