उद्या कुणीही उठून पक्षावर दावा सांगेल, अध्यक्ष निवडीवरुन शिवसेना खासदार भडकले
बंडखोर गटानेच स्वत: मूळ पक्ष म्हणून घेण्याची ही देशातली पहिलीच केस आहे. यावर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अरविंद सावतं?
राज्यात ज्या प्रकारे नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या सर्व गोष्टी संविधानानुसार झाल्यात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रात नवं सरकार निर्माण करताना राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टीला निमंत्रण दिले नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून व्हिप जारी केल्यानंतरही बंडखोर आमदारांनी पक्ष आदेश मानला नाही. त्यामुळे याविरोधात आम्ही अध्यक्षांकडे कारवाईचं पत्र दिल आहे. 39 आमदारांनी पक्षादेश पाळला नाही. त्यामुळे अध्यक्षांनी या आमदारांवर निलंबनाची कारवाई करावी, असं आम्ही अध्यक्षांना विनंती केली आहे.
Comments
Post a Comment