तडसर जिल्हा परिषद गटातून पैलवान रणजीत पवार यांची सर्व तालुकाभर चर्चा.
अगदी तोंडावर येवून ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील सांगली जील्हा आणि कडेगाव पलूस तालुक्यातील
नुकत्याच आरक्षणाच्या जागा जाहीर झाल्या.
यामध्ये तडसर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आणि पं.ग. सर्वसाधारण महिला , शाळगाव प.स.गण सर्वसाधारण असा आरक्षण पडलेल आहे .
काँग्रेसकडून तडसर गावचे महाराष्ट्र चॅम्पियन , मल्लसम्राट केसरी पैलवान रणजीत पवार यांच्या नावाच्या चर्चेन कडेगाव तालुक्यात जोर धरला आहे. तडसरच्या जिल्हा परिषद गटात तडसर ,शाळगाव 2 पंचायत समिती गण आहेत.
पैलवान रणजीत पवार हे तडसर गावचे जेष्ठ नेते मा.जी.परिषद सदस्य व्यंकटराव पवार यांचे पुतणे आहेत, स्व पतंगराव कदम साहेब याच्या राजकीय जडण घडणीच्या काळापासून व्यंकटराव पवार याचा आणि कुटुंबाचा प्रखरतेने सहभाग आहे.
पै. रणजीत पवार यांचा कुस्ती क्षेत्रात अभिजीत दादा कदम कुस्ती केंद्र मधून महाराष्ट्रभर लौकिक आहे, पै.रणजीत पवार हे माजी मत्री डाॅ.विश्वजीत कदम साहेब आणि जितेश कदम यांच्या विश्वासू फळीतील एक धडाडीचा, कर्तृत्ववान, नवका चेहरा मानला जातो. पै.रणजीत पवार यांना राजकीय वारसा असून कुस्ती ,उद्योग आणी समाजकारणातील अनुभव आढळून येतो.
तडसर जील्हा परिषद गटावर आमदार मोहणराव कदम दादा , मा.मत्री विश्वजीत कदम साहेब जेष्ठ नेते व्यंकटराव पवार यांचा प्रभाव आहे, पै. रणजीत पवार यांचा दांडगा सम्पर्क आणि युवकांचा ,पैलवान मंडळीचा काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा एक मोठा वर्ग आहे याचे दर्शन मार्च मधील मल्लसम्राट केसरी किताबाच्या सक्तार समारंभ कार्यक्रमात सर्वे जील्हाला झाल होत.
जनतेतुन नेहमीच पै.रणजीत पवार याचं एक संयमी नेतृत्ववान अस नाव घेतले जात. आजच्या राजकीय परिस्थितीकडे पाहता अश्या निष्ठावान कुटुंबातील खंबीर युवकाला तडसर जील्हा परिषद गटातून उमेदवारी ही कदम कुटुंबीय आणि काँग्रेस पक्षाला फायद्याची ठरेल यात काही शंका नाही..
Comments
Post a Comment