तडसर जिल्हा परिषद गटातून सुरज पवार यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी गटातील नागरिकांनी धरला जोर !
नुसत्याच आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका लागल्या असून इच्छुकांची आत्ता रांग लागायला चालू झाली आहे तडसर जिल्हा परिषद गट तसा चुरशीचा गट मानला जातो ह्या गटाचे सर्वसाधारण मतदान 35 हजारांच्या दरम्यान आहे
जिल्हा परिषेदेसाठी या गटात सर्वसाधारण आरक्षण पडले आहे तर तडसर पंचायत गणात देखील सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे
राजकारण करत असताना त्याला समाजकारणाची जोड असणे महत्त्वाचे आहे . आणि अशातच तडसर गटातून एक चेहरा समोर येतो म्हणजे सुरज पवार यांचा तडसर गावचे युवा आणि काँग्रेसचे धडाकेबाज नेतृत्व सुरज पवार यांच्या सामाजिक सेवेचा आरसा हा नेटका आणि स्पष्ट आहे. सुरज श्रीधर पवार यांनी आपल्या भक्ति फाउंडेशन तर्फे अनेक दानधर्म केला आहे त्याच बरोबर ते स्कूल कमिटी सदस्य आहेत त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबाला एक मोठा राजकीय व सामाजिक वारसा आहे त्यांचे आजोबा 1972 ला गावचे सरपंच होते त्यांचे वडील श्रीधर पवार हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत
सामाजिक कामात त्यांचे कुटुंब नेहमी पुढे अग्रेसर असते . तडसर मधील रयत शिक्षण संस्थेतील सभागृह बांधून देऊन त्यांनी गावातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगले काम केले आहे तसेच त्यांच्या चुलत्यांच्या नावाने प्रदीप महादेवराव पवार वस्तीग्रह देखील बांधून दिलेले आहे
यांच्या चुलत्यांनी नातेपुते येथे चालू केलेला भाकरी वाटपाचा उपक्रम सुरज दादा तडसर गावच्या सहकार्याने विठू माऊलींच्या वारिला जात जेवण वाटप करीत सेवा करीत असतात याला तडसर गावचे नागरिक , युवक सर्वच त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात
2019 ला महापूर आला आणि पूर परिस्थितीत पलूस मुक्या जनावरांचे हाल होत आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी
तालुक्यातील जनावरांना मोफत चारा वाटप तसेच कुटुंबांनाही धान्य वाटप केले होते व मयतांना आर्थिक मदत त्यांनी केली आणि सामाजिक बांधिलकी जपली
सुरज पवार हे सामाजिक असो राजकीय असो किंवा शैक्षणिक सर्वच क्षेत्रात समाजासाठी झगडताना दिसत आहेत माजी मंत्री आ.डॉ विश्वजीत कदम व डॉ.जितेश कदम यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गावातील युवकांची मोठी फळी घेऊन भिलवडी व चोपडेवाडीत स्वच्छता मोहीम सुद्धा त्यांनी राबवली व गावातून आर्थिक मदत केली
वर्षाला होतकरू विद्यार्थ्यांना बक्षीस व ट्रॉफी वाटप
तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत ते करत असतात
डॉक्टर पतंगराव कदम व मोहनराव कदम दादांचा त्यांच्यावर प्रभाव आहे
डॉ विश्वजीत कदम यांच्या माध्यमातून लोकांना मदत करण्यास त्यांचा पुढाकार असतो साहेबांच्या वाढदिवसाला आणि आता पुण्यतिथीला सामाजिक उपक्रम ते राबवतात त्यामुळे काँग्रेसला त्यांच्या रूपाने एक रुबाबदार , संयमी आणि चांगले नेतृत्व भेटणार आहे
सुरज पवार यांच्या उमेदवाराचा काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. तर पक्षश्रेष्ठींनी सुरज दादांना उमेदवारी द्यावी असा जोर कार्यकर्ते आणि तडसर जिल्हा परिषद गटातील युवकांनी धरला आहे
अडचणीतील लोकांना मदत देखील केली होती
Comments
Post a Comment