कडेगाव मध्ये महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघड

कडेगाव मध्ये MSEB चा भोंगळ कारभार उघड !
MSEB नक्की कोणाची सर्वसामान्यांची का पिळवणूक करून पैसे उखळणाऱ्या एजंटची..?

महाराष्ट्र राज्य विधुत महामंडळ सध्या गरिबांना लुटत आहे तर 
गोरगरिबांच्या हक्काचा घास काही लाचार अधिकारी हिरावून घेऊन ते कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या नरड्यात घालत आहेत कडेगावच्या MSEB मध्ये तर हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे TLN मराठीच्या निदर्शनास आले आहे काही रुपयांच्या चिरीमिरीसाठी जर अधिकारी वर्गच विकला जात असेल तर मात्र ही क्लेशदायक बाब आहे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्यातील असलेल्या साटेलोट्यामुळे सर्वसामान्यांचा मात्र हक्क हिरवला जात आहे आणि सदरच्या बाबी उघड झाल्या तर वरिष्ठ अधिकारी मात्र हात वर करून इतरांच्या अंगावर प्रकरण ढकलाढकलीचा प्रकार सध्या सुरू आहे जर वाढीव बिल आले तर गरिबांना ह्या ऑफिस मध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत मात्र कडेगाव मधील काही कॉन्ट्रॅक्टर दलाल यांच्याकडे गेल्यावर कोणतेही काम जास्तीचे पैसे देऊन तात्काळ होत असल्याचा प्रकार देखील उघड झाला आहे प्रशासनाने  कडेगावच्या MSEB ऑफिस मध्ये लक्ष घालून हा सगळा प्रकार थांबवावा अशी मागणी सद्या जनतेतून केली जात आहे

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर