कडेगाव महावितरण आणि दलाल कॉन्ट्रॅक्टर यांच्यात साटेलोटे आहेत का...?

भ्रष्टाचारकी पोलखोल 2

विज मीटर शिल्लक नसलेमुळे विज कनेक्शन जोडण्यात विलंब होतो किंवा वीज मीटर बाहेरून घ्यावा लागतो बाहेरून म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टर कडून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य ग्राहक मात्र आता ह्या गोष्टीला वैतागले आहेत कडेगाव तालुक्यात अशी दयनीय अवस्था आहे 
कडेगाव MIDC आर्थिक भाराखाली आहे असं म्हणणे नक्कीच वावग ठरणार नाही. कडेगाव MIDC च्या बहुतांश कंपन्या बंद स्वरूपात आहेत MIDC वर असणारे टेक्सटाईल झोन उटवल्याननंतर जरी MIDC खुली करण्यात आली असली तरी  नवनवे उद्योग मात्र ह्या कडेगाव ( शिवाजीनगर )  MIDC मध्ये अध्यापही आलेले दिसत नाहीत आणि जे आलेत ते खूप कमी स्वरूपात आहेत त्यातच एखादं इंडस्ट्रियल कनेक्शन घायच म्हंटलं आणि त्यासाठी कडेगावच्या महावितरण मध्ये पदार्पण केल तर तिथुन मीटर शिल्लक नाही अस हमखास उत्तर येतच..!
पण यामुळे भागातील वीज ग्राहक पुरते वैतागले असून महावितरण अधिकारी
यांच्याकडून कुत्रीम विज मिटरची टंचाई होत असल्याचा आरोप वीज ग्राहक करत आहेत.
 त्यात भर म्हणून काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत ग्राहकाला मिटर नाही म्हणून सांगणे आणि कॉन्ट्रॅक्टरने मीटर मागितल्यावर त्याला देणे आणि तेच मिटर ग्राहकाला जास्तीचे पैसे घेऊन कॉन्ट्रॅक्टरने देणे असा सगळा गोंधळ चालू आहे 
कॉन्ट्रॅक्टरला महावीतरण कंपनीचा मीटर मिळतोच कसा...?

अनेक ग्राहकांनी मीटरची मागणी केलेली आहे पण कंपनी कडून मीटर आले नाही , मीटर शिल्लक नाही असे महावितरण कडून ग्राहकांना सांगितले जाते पण तोच मीटर बाहेर असणाऱ्या दलाल कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे जास्तीचे पैसे देऊन मिळतो म्हनजे नक्कीच अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यात आर्थिक साटेलोटे असावे असे वाटतेय पण याचा वरिष्ठ समितीकडून छडा लागणे गरजेचे आहे 

दलाल कॉन्ट्रॅक्टरला मदत करणार पाटील साहेब कोण...?
 
मी पाटलाचा लेक मी एकुलता एक मी काहीही करिन 
एक प्रसिद्ध गाणे आपण यापूर्वी ऐकले असावे !

हा मीटर महावितरण कंपनीचाच आहे आणि हा विषय घेऊ नका मला पाटील साहेबांनी मदत केली आहे आपण त्यांचं नाव घेऊ नका असा धक्कादायक खुलासा एका कॉन्ट्रॅक्टरने केला आहे पण जनतेच्या हक्काचे मिटर त्यांना डायरेक्ट न देता ते कॉन्ट्रॅक्टर कडून मिळते आणि यासाठी पाटील साहेबांची मदत होते नक्कीच पाटील साहेब कोणतरी मोठी हस्ती असावी आणि याचा शोध आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लावणे गरजेचे आहे 

ती पावती कोणत्या अधिकाऱ्यांच्या नावाने फाटली ? त्या पावतीवर ग्राहकांची सही का नाही ..? 

(लवकरच...भ्रष्ट्राचाराची पोलखोल भाग 3 मध्ये )

पाहण्यासाठी subscribe करा TLN मराठीच्या Youtube चॅनेल आणि वेब पोर्टल ला

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर