जिल्हा परिषद निवडणुकीत तडसर गट ठरणार चुरशीचा
काय सांगताय मामा....!
TLN मराठीच्या काय सांगताय मामा ह्या एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत.
सांगली जिल्हा परिषदेची निवडणूकीची आरक्षण सोडत झाली आणि कडेगाव तालुक्यात अनेक पालते पडलेले हिरे सरळ होऊन चमकू लागलेत. आपल्या नेत्यापुढे मी किती श्रेष्ठ आणि माझे नेतृत्व किती मोठे याचे प्रात्यक्षिक आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेच. कडेगाव तालुक्यात खऱ्या अर्थाने राजकीय चुरस आहे ती म्हणजे तडसर जिल्हा परिषद गटात कारण याठिकाणी सर्वसाधारण आरक्षण लागले आहे.
यामुळे बरेच इच्छुक , हौसे गवसे आणि नवसे मैदानावर शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत कोण किती श्रेष्ठ हे सिद्ध करीत आहेत.
अर्थातच आपल्या नेत्याच्या नजरेत मी मोठा आहे अन मलाच उमेदवारी द्यावी अशी प्रतिकृती सध्या इच्छुक बनवत आहेत.
कोणत्या गावात सर्वात जास्त इच्छुक पाहायला मिळाले..?
पूर्ण कडेगाव तालुक्यात आणि तडसर जिल्हा परिषद गटात तडसर या गावात तिकिटं मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे पण यातील बहुतांश इच्छुक हे काँग्रेस विचाराचे आहेत आणि प्रत्येकाला काँग्रेस मधून तिकीट पाहिजे अरे पन बाबांनो तिकीट एकच आहे अन ते कोणातरी एकाला मिळणार आहे तिकिटाचे पण त्या गोष्टीतल्या तीळा सारखे असायला पाहिजे होते म्हणतात ना एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता त्या प्रकारे काँग्रेस कडून उमेदवारीच तिकीट सुद्धा वाटून खाता येईल !
असो.. तडसर गटात खुल आरक्षण पडल्या मुळे ह्या ठिकाणी इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत आणि जास्तीत जास्त इच्छुक हे काँग्रेस पक्षातील आहेत
त्यामानाने भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये एवढी रस्सीखेच काय दिसत नाही , त्यामुळे त्यांचे नेते संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या पुढे अजून तरी कोणते पेचाचे कारण नाही
सध्या तडसर जिल्हा परिषद गट लढवण्यासाठी काँग्रेस मधून तडसर गावातूनच 5 ते 6 लोक किंवा त्याच्याहुन अधिक लोक इच्छुक आहेत अशी महिती गोपनीय सुत्रांमार्फत मिळत आहे तर नेर्ली , बोंबाळवडी , हिंगणगाव ह्या गावातील दावेदार लोकसुद्धा काँग्रेस मधून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत एवढे सगळे जरी इच्छुक असले तरी तडसर मधील काहीच इच्छुक सोशल मीडियावर व्यक्त झाले बाकीची मंडळी मात्र अजून चिडीचूप आहेत स्वताच्या तोंडातून ब्र शब्द किंवा कसलंही स्टेटमेंट येत नाही पण त्यांच्या भोवताली असलेले कार्यकर्ते यांच्या हालचालींवरून हे साफ स्पष्ट होत आहेत की "हंम भी लढाई के लिये तयार हो रहे है"
काँग्रेस समोर पेच निर्माण होण्याची शक्यता..?
तडसर गटातील अनेक लोक जिल्हा परिषदेसाठी दावेदार आहेत आणि अनेक लोक इच्छुक आहेत अशी माहिती सुत्रांमार्फत मिळत आहे मात्र तिकीट कोना एकाला जाणार असल्याने पक्षात बंडखोरी किंवा नाराजी होण्याची शक्यता आहे,पण माजी मंत्री आमदार विश्वजित कदम जाणते राजकारणी असल्याने त्यांचे ह्या सर्व गोष्टींवर नक्कीच बारकाईने लक्ष असणार आहेत त्यामुळे काँग्रेस पेचात सापडते का नाही हे मात्र येणारी वेळच सांगेल.
राष्ट्रवादी जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार की नाही यावर सुद्धा बऱ्याच लोकांचं लक्ष लागून राहिले आहे , तर तडसर गटातील काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा ह्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे
कदम घराण्यातील युवानेता तडसर गट लढवणार..?
जर बरेच हौसे बाहेर यायला लागले आणि त्यामधून पक्षाला आघात होण्याची चिन्हे दिसू लागली तर मात्र कदम घराण्यातील युवानेता तडसर गटातून राजकीय आखाड्यात उतरू शकतो कारण जर तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच वाढू लागली आणि त्यातून बंडखोरी होण्याची चिन्हे दिसू लागली तर मात्र याशिवाय पर्याय राहणार नाही पण त्या पक्षाचे नेते काय ठरवतात यावर ते अवलंबून आहे .
पण जर कदम घरातील युवानेता तडसरच्या मैदानात उतरला तर मात्र भाजप कडून सुद्धा देशमुख घरातील युवानेता निवडणुकीसाठी विरोधकाच्या भूमिकेत दिसु शकतो एकंदरीत तडसर गटातील ही निवडणूक ही सर्वात चुरशीची दिसणार आहे ही निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी होणार आहे ..
Comments
Post a Comment