पाटील साहेबांनी चाटली लाखोंची मलई ? कडेगाव महावितरण मधील भ्रष्टाचार थांबणार कधी...?

भ्रष्टाचार की पोल खोल ..
कडेगाव महावितरण मधून जनतेची लूट केली जातेय , सर्वसामान्य लोकांना काँट्रॅक्टरच्या जाळ्यात ढकलले जातेय हे आपण TLN मराठीच्या माध्यमातून वेळोवेळी दाखवले आहेच.
दलाल कॉन्ट्रॅक्टर आणि महावितरणचे पाटील साहेब यांच्यात साटेलोटे असल्याचा धक्कादायक खुलासा स्वतः एका कॉन्ट्रॅक्टरने भ्रमणध्वनी वरून केला आहे त्याचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा TLN मराठीच्या हाती लागले आहे दरम्यान कॉन्ट्रॅक्टर याने बोलताना मला पाटील साहेबांनी मदत केली असे सांगितले आहे कडेगावच्या महावितरण मधील पाटील साहेब कोण याचा शोध मात्र अजून वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागलेला नाही 
यासंदर्भात महावितरणच्या विटा शाखेतील वरिष्ठ अधिकारी साहेबांना यांसदर्भात विचारणा केली असता कडेगावच्या महावितरण मध्ये पाटील साहेब 2 असल्याने खरा पेच निर्माण झाला आहे 
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय  कारवाई केली..?

आज दलाल त्यांचे पंटर आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या मुळे सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे आणि जर भ्रष्ट प्रकार उगडकीस येऊ लागला तर वरिष्ट अधिकारी सुद्धा त्यांची पाठराखण करत आहेत यामुळे ते सुद्धा या सर्व प्रकारात सामील आहेत का असा प्रश्न पुढे उपस्तीत होत आहे ?
वरिष्ठांना या संदर्भात विचारणा केल्यावर काय उत्तर मिळाले ?

विटा येथील महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयात यासंदर्भात विचारणा केली असता सदर प्रकाराबाबत खुलासा मागितला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे मात्र आता बरेच दिवस उलटून गेले तरी करावी मात्र अजून काय झालेली दिसत नाही यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी टाळाटाळ करीत याची प्रेसनोट अथवा माहिती आमच्या PRO कडून घ्यावी असे उडवाउडवीचे  उत्तर मिळाले आहे 
कारवाई होत नाही याचा अर्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा प्रकार चालू आहे अशी चर्चा लोकांचात आहे

पाटील साहेबांची मिळतोय महिना 
 लाखोंचा मलिदा?

आमच्या साहेबांना महिन्याला लाखो रुपये मिळत आहेत आणि साहेबांची पोच मोठी आहे त्यांना कोणी काय करू शकत नाही  पण आपण याबाबत माझे नाव उघड करू नका अशी गोपनीय माहिती एका कर्मचाऱ्याने  दिली आहे

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर