कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला , धरणाच्या पाणीपातळीत होतेय वाढ
विशेष प्रतिनिधी / : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात प्रतिसेकंद 14 हजार 152 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या धरणात 16 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासात तब्बल मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे, मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे, पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली आहे.संपुर्ण जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने कोयना धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला होता. पश्चिमेकडील वीजनिर्मिती ठप्प होण्याच्या मार्गावर होती. अशातच आता पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे तर दोन दिवसात पाणीसाठ्यात 2 TMC ने वाढ झाली आहे
Comments
Post a Comment