कडेगाव येथे १० व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रशस्तिपत्रक व ट्रॉफीचे वितरण करताना मा.धनश्री वहीनी लाड व अन्य.

कडेगाव /प्रतिनिधी 
कुठल्याही क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि कामात प्रामाणिक पणा असेल तर त्या क्षेत्रात यश हे निश्चित भेटेल अशा प्रकारे आपण देशाचे, राज्याचे, जिल्हाचे नाव उंच शिखरावर घेऊन जाणार अशी अपेक्षा मा. धनश्री वहीनी लाड यांनी व्यक्त केली. 
            पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरूण (आण्णा) लाड व जिल्हा परिषदेचे गट नेते शरद (भाऊ) लाड यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव येथे सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या वतीने दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. 
          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. धनश्री वहीनी लाड तर प्रमुख पाहुणे म्हणून रवि बावडेकर होते.  याप्रसंगी सांगली जिल्हा युवती अध्यक्षा पुजाताई लाड, कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश शिंगटे, कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. वैशालीताई मोहिते, कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष विराज पवार, कडेगाव तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षा स्नेहल कदम, कडेगाव पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्र करांडे, अतुल नांगरे प्रमुख उपस्थितीत होते. 
           यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रशस्तिपत्रक व ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. यावेळी रवी बावडेकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील करिअर संबधी माहिती देवून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
         सुत्रसंचालन मिनाज मुल्ला यांनी केले. यावेळी संभाजी पाटील, विनोद जाधव, सिकंदर मुल्ला, प्रणिताताई पाटील, मिनाज मुल्ला, जयश्रीताई चव्हाण, सुजाता पवार, अरूणा सावंत, दिपाली सावंत, भारती पोळ, कौशल्या गायकवाड हेमाताई पाकळे, सुनिताताई तांदळे मायाताई पोळ, महादेव मोहिते, राहुल जाधव, यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार कडेगाव पंचायत समितीचे माजी सभापती महेंद्र करांडे यांनी मानले. 


Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर