कडेगाव बाजारपेठेतील रस्त्याची दुर्दशा कॉन्ट्रॅक्टरचा निकृष्ट कारभार चव्हाट्यावर
पाणी संघर्ष समिती आणि राष्ट्रवादी कडून 18 फेब्रुवारी पूर्वी रस्ता नाही झाला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता
कडेगाव मधील बाजारपेठेतील मंजूर झालेल्या रस्त्याचे काम करून नुसतेच दोन ते तीन महिने झाले असावेत मात्र त्या रस्त्याची आता चाळण झाली आहे रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत यामुळे या रस्त्याचे काम केलेल्या कॉन्ट्रॅक्टरचा निकृष्ट आणि भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे यापूर्वी पाणी संघर्ष समिती व राष्ट्रवादी पक्षातर्फे दिनांक 18 फेब्रुवारी पूर्वी हे काम पूर्ण व्हावे अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा दिला होता त्यानंतर हे काम पूर्ण करण्यात आले आणि हे आंदोलन देखील स्थगित करण्यात आले होते
काम चालू झाले आणि आंदोलन स्थगित झाले
हे काम पूर्ण झाले खरे पण सदर कामात दर्जाचा अभाव दिसून येत आहे हे काम पूर्ण करून केवळ दोन-चार महिन्यांचा कालावधीत झाला आहे मात्र या रस्त्यावर पाणी साठले आहे, खड्डे पडले आहेत ,अगदी दोन-चार पावसांच्या चळकेमध्येच ह्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
सध्या रस्त्यावर पडलेले खड्डे
खऱ्या अर्थाने या रस्त्याच्या दर्जाची तपासणी झाली होती का?
यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्याचबरोबर सदरचा रस्ता पूर्ण केलेल्या कॉन्ट्रॅक्टरच्या निकृष्ट कामाचा परदाफाश झाल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे सदर कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेतून केली जात आहे त्याचबरोबर सदरचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे
Comments
Post a Comment