निकृष्ट काम केलेल्या कॉन्ट्रॅक्टरला नगराध्यक्षांनी नोटिशीतून ठणकावले
कडेगाव मधील बस स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या बाजारपेठेतुन जाणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर असून यापैकी बस स्टँड ( किरण मेडिकल) पासून ICICI बँक पर्यंत रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण झाले होते सदर रस्त्याचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या निकृष्ट कारभाळामुळे सदर रस्त्याला खड्डे पडले आहेत ,
जागोजागी पाणी साठले आहे अगदी 2 ते 3 महिन्यातच रस्त्याची ही अवस्था झाली आहे सदर काँट्रॅक्टरचा निकृष्ट कारभार TLN मराठीने चव्हाट्यावर आणल्यानंतर कडेगावचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष धनंजय देशमुख (भैय्या) यांनी तात्काळ याची दखल घेत सदर काँट्रॅक्टरला नोटीस बजावली आहे कामात कोणताही हलगर्जी पणा चालणार नाही असे देखील नगराध्यक्ष यांनी ठणकावले आहे
तर नोटीसीत म्हंटल्याप्रमाणे सदरचे खड्डे बुजवून त्याचा अहवाल 48 तासात सादर करण्यात यावा अन्यथा आपणावर कार्यवाही करण्यात येईल असे ठणकावण्यात आले आहे
कडेगावच्या स्मार्ट नगराध्यक्षांनी तात्काळ निर्णय घेतला असून सदरचे खड्डे बुजवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर सांगण्यात आले आहे
यामुळे नगराध्यक्ष यांची कर्तव्यदक्षता आणि जनतेपोठी असणारी कार्यनिष्ठा दिसून आली आहे
Comments
Post a Comment