शेळकभाव येथेल घटनेवर सामाजिक कार्यकर्ते आक्रमक संबंधित , मंडळ अधिकारी , तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

कडेगाव तालुक्यातील शेळकबाव येथे तलाठ्याला वाहन पकडून दिले म्हणून ९ जणांच्या टोळक्याने दोघांना जबर मारहाण केली.
शरद केदारी कदम (वय ४५) यांनी यासंदर्भातची फिर्याद  चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात दिली असून यासंदर्भात चिंचणीं वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


वाहन पकडून कोणी दिले याची महिती चोरांना कशी लागली ..?

आत्ता पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित झाला आहे तो म्हणजे वाहन पकडून दिले किंवा टीप दिली तर ती त्या चोरांना कशी समजली ..
जर एखाद्या व्यक्तींने प्रशासनाला वाळूचोरीची गोपनीय  माहिती कळवली तर सध्या महागात पडत आहे त्यामुळे लोकांचा कडेगाव तहसील प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही 

या प्रकरणाची सखोल चौकशी लागावी..

या प्रकरणाची सखोल चौकशी लागावी त्याच बरोबर ह्यामध्ये कोणत्या अधिकारी , कर्मचारी यांचे साटेलोटे आहेत का याची तपासणी तात्काळ करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि RPI (A) गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ ,शेतकरी संघटनेचे विजय माळी यांनी केली आहे 
अन्यतः तीव्र आंदोलन उभारणार असल्याचे सुद्धा संघटनेने सांगितले आहे , प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सदर प्रकार होत असून याला प्रशासन जबाबदार आहे असे होवाळ म्हणाले.




शेळकभाव येथे घडलेल्या या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहितिप्रमाणे शरद केदारी
कदम यांचा चुलत भाऊ नामदेव नारायण कदम यांनी
गावकामगार तलाठ्याला टेंम्पो पकडून दिला, या रागातून
दोघा भावांना लाथाबुक्यांनी जबर मारहाण करण्यात आली. ही घटना दि. १७ ऑगस्ट रात्री सव्वानऊच्या सुमारास
घडली यासंदर्भातील संशयित आरोपी रविंद्र उत्तम गुजले, राहुल गुजले, अक्षय
बाळासो जाधव, अतुल बाळासो जाधव, राहुल छबन
जाधव, रोहित छबन जाधव, सुहास मदने, रुपेश मदने,
अरविंद शिरतोडे यांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा
तपास हवालदार श्री. तांदळे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर