भारतीय स्वराज्य क्रांती पार्टी सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद जागा लढवणार
भारतीय स्वराज्य क्रांती पार्टी सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद जागा लढवणार
सचिव :- ओंकार महाडीक
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी भारतीय स्वराज्य क्रांती पार्टीने कंबर कसली असून येणाऱ्या आगामी निवडणूक मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व जागा वरती उमेदवार देणार असल्याची माहिती पक्षाचे सचिव ओंकार महाडीक यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषित केले
भारतीय स्वराज्य क्रांती पार्टी ची स्थापना 1 जानेवारी 2019 या दिवशी सर्व सामान्य जनतेच्या उठवातून निर्मिती झाली , शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी , तरुण युवकांचा राजकारण मध्ये सहभाग वाढीविणे व तरुण पिढीचा विधायक कामासाठी उपयोग करून घेणे असा पार्टीचा अजेंडा असून जातिधर्मात तेढ कमी करुन आदर्श सामाजिक परिवर्तनातून एक आदर्श भारत निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करू.
भारतीय स्वराज्य क्रांती पार्टी राजकिय वारसांना उमेदवारी न देता म्हणजे घराणेशाहीला विरुद्ध सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील नवीन युवकांना संधी देणार असल्याचे यावेळी सचिवांनी असे जाहीर केले.
आत्ता अस्तित्वात असणारे पक्ष हे युवकांचा वापर फक्त राजकीय प्रचारासाठीच केला जातो आत्ता अस्तित्वात असणाऱ्या पक्षातून घराणेशाही दिसून येते त्यामुळे चांगल्या कर्तबगार युवक राजकारणापासून अलिप्त राहतात तसेच नव्या पिढीच्या माध्यमातून विकासाचे धोरण राबवून युवकांच्या डोक्यातील नव नवीन कल्पनांचा वापर करून एक आदर्श राजकीय वाटचाल अस्तित्वात आणण्याचा पार्टीचा प्रयत्न असणार आहे.
ज्या युवकांना धर्म निरपेक्ष राजकारणासाठी पक्षात प्रवेश करायचा आहे त्या युवकांना सचिव ओंकार महाडीक यांच्याशी संपर्क साधावा. +918485854399
Comments
Post a Comment