स्वखर्चातुन रस्त्यावर मुरूम टाकत कडेगावच्या नगरसेवकाने जपली सामाजिक बांधिलकी

स्वखर्चातुन रस्त्यावर मुरूम टाकत कडेगावच्या नगरसेवकाने जपली सामाजिक बांधिलकी 


कडेगाव येथील प्रभाग नंबर 2 चे नगरसेवक सागर सकटे यांनी स्वखर्चातून रस्त्याचे मुरुमीकरण करून एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे सध्या कडेगाव नगरीत भाजप ची सत्ता असली तरी सत्ता नसताना सकटे यांच्या सारखे नगरसेवक मात्र आपल्या कामाच्या जोरावर समाजात एक वेगळा आदर्श निर्मात करत आहेत मग त्यासाठी त्यांच्या स्वताच्या खिशाला झळ लागली तरी त्यांना पर्वा नाही 
आधीचा रस्ता


काम झाल्यानंतरचा रस्ता 



सततच्या पडणाऱ्या पावसमुळे कडेगाव मधील कडेगाव चिखली या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता यामुळे लोकांना जाण्यायेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती शिवाय वाहने जाणे सुद्धा अवघड होते हे नगरसेवक सागर सकटे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वताच्या खर्चातून ह्या रस्त्याचे मुरुमीकरण करून त्यांनी हा रस्ता येण्याजाण्यासाठी सुरू केला आहे 
त्यांच्या ह्या कामगिरीचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे
युुवा नगरसेेेवक आणि माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सागर सकटे यांची ओळख आहे अतिशय कमी वयात ते नगरसेवक झाले असून नेहमीच सामाजिक कार्यासाठी ते अग्रेसर असतात 

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर