तलाठी वैभव तारळेकर यांच्यावर जिल्हाधिकारी करणार कारवाई..?

कडेगाव : 
 RPI आंबेडकर गट , शेतकरी संघटना आणि शेळकभाव येथील नागरिक यांची कडेगाव प्रांत अधिकारी यांच्या समक्ष उपस्थित एक बैठक संपन्न झाली याचे निम्मित होते ते म्हणजे अवैध्य वाळू चोरी. 
काही दिवसा पूर्वी वाळूचे वाहन का धरून दिले म्हणून शेळकभाव   येथील एका नागरिकाला जबर मारहाण झाली होती त्यानंतर शेळकभाव सह परिसरामध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे 
कडेगावचे उपविभागीय अधिकारी यांना दिनांक
 22 /8/2022 रोजी निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हंटल्याप्रमाणे गावातील वाळू वाहने जप्त करून गावातील वाळू उपसा व वाहतुक बंद करावी अशी विनंती करण्यात आली आहे यावेळी नागरिक मोठ्या आक्रमक भूमिकेत होते 
निवेदनात म्हंटल्याप्रमाणे याबाबत अधिक माहिती अशी की शेळकभाव येथील नदीपात्रातून , स्मशानभूमी येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत आहे त्यानुसार गावातील नागरिकांनी याची तपासणी केली असता गावातील एका व्यक्तीच्या घराशेजारी मोठा वाळूसाठा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला सांगून सुद्धा अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे तर शेळकभाव मध्ये जो काही मारामारीचा प्रकार घडला त्याला  जबाबदार गाव कामगार तलाठी वैभव तारळेकर आहेत असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे
तलाठी वैभव तारळेकर यांचे कॉल डिटेल्स चेक करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. त्याच बरोबर वैभव तारळेकर याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी RPI आंबेडकर गट आणि शेळकभाव येथील नागरिकांनी केली आहे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

शेळकभाव नागरिकांना नवीन जिल्हाधिकारी न्याय देणार का..?
शेळकभाव येथील नागरिक आपले निवेदन मागण्या घेऊन सांगली जिल्हाधिकारी साहेबांच्या दारात काल दिनांक 24 रोजी गेले होते गावातील अवैध्य वाळूचोरी थांबावी त्याच बरोबर तलाठी वैभव तारळेकर यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती यावेळी आपल्या निवेदनातून नागरिकांनी केली आहे

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर