श्री.अजितराव युवराज ननवरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस-सोशल मिडीयाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुखपदी नियुक्ती
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सोनहिरा सह. साखर कारखान्याचे माजी संचालक, आदरणीय स्व. शिवाजीराव क्रृष्णाजी ननवरे (आण्णा) यांचे पुतणे व नेवरी गांवचे सुपुत्र, शिव- विश्व उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री.अजितराव युवराज ननवरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस-सोशल मिडीयाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे निवडीचे पत्र त्यांना दिले असून, त्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.ना.डॉ.विश्वजित कदम, सांगली जिल्ह्याचे युवा नेते, भारती बँकेचे संचालक, मा.डॉ.जितेश कदम (भैय्यासाहेब), सागरेश्वर सुतगिरणीचे चेअरमन शांताराम (बापु) कदम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे, उपाध्यक्ष, अनिकेत (दादा) म्हात्रे , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ( सोशल मेडियाचे) समन्वयक श्री. दिलीपसिंह देशमुख, सोशल मिडिया,सांगलीचे प्रमुख, आनंद राव ढाणे,
कडेगांव चे माजी उपनगराध्यक्ष मा. श्री. सागर सुर्यवंशी,
सागरेश्वर सुतगिरणीचे माजी चेअरमन मा. सुरेशचंद्र निर्मळ ,
युवक काँग्रेस- पलुस- कडेगांवचे, सरचिटणीस मा. दत्तात्रय ननवरे, यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
या निवडीबद्दल सर्व स्तरातून अजितराव ननवरे यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.... टी. एल. एन. शी बोलताना अजित ननवरे म्हणाले की, माझ्या खांद्यावर दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी आत्मविश्वासाने प्रयत्न करीन, तसेच काँग्रेस पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन.
अशी अपेक्षा अजित ननावरे यांनी व्यक्त केली
Comments
Post a Comment