कडेगाव मधील मुद्रांक विक्रेत्यांचा मनमानी कारभार | सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

कडेगाव मधील मुद्रांक विक्रेता ( स्टॅम्प वेंडर ) यांचा मनमानी कारभार चालला आहे 
यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र हैराण झाला आहे 
गोरगरीब लोकांना ,विद्यार्थ्यांना , शेतकऱ्यांना बँककामी , नोटरी कामी अन्य शासकीय , खासगी किंवा शाळेच्या कामी  100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्पची गरज पडत असते
पण लोकांनी स्टॅम्प खरेदी साठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत जसे की स्टॅम्प शिल्लक नाही , उद्या या ! अर्थातच बरेच मुद्रांक विक्रेते जे लोक  आपल्या स्वत्ताकडे एखादे काम करणार आहेत अशाच लोकांना स्टॅम्प देत आहेत 
तर 100 च्या स्टॅम्प मागे काही जण 110 रुपये दर आकारत आहेत तर त्याच पद्धतीने 500 च्या स्टॅम्प मागे सुद्धा जास्तीचा दर आकारला जात आहे
तर काही स्टॅम्प विक्रेते निष्क्रिय असून ते स्टॅम्प घेत नाहीत त्यामुळे शासनाचा आणि लोकांचा तोटा होत आहे. 
मुद्रांक विक्रेत्यांवर कारवाई होणार का..

या आधीही अनेक नागरिकांनी मुद्रांक विक्रेत्यांची तोंडी किंवा लेखी तक्रार करूनही प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेत आहे 
मुद्रांक विक्रेत्या लोकांच्या दुकानात फलक लावलेले असतात त्यामध्ये प्रत्येक मुद्रांक विक्रेत्याकडे किती स्टॅम्प घेतले किती शिल्लक आहेत याबद्दलची माहिती लिहिणे अनिवार्य असताना कडेगाव मधील मुद्रांक विक्रेत्यांचे फलक मात्र नेहमी रिकामे दिसत आहेत त्यामुळे मुद्रांक विक्रेत्यांवर कारवाई होणार का नाही असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे 
निष्क्रिय स्टॅम्प विक्रेत्यांवर कारवाई होणार ?
स्टॅम्प खरेदी करण्यासाठी गेले असता प्रत्येक वेळेस जर स्टॅम्प नाही असे उत्तर येत आहे तर मग याचा अर्थ तो मुद्रांक विक्रेता स्टॅम्प भरतच नाही का..?
आणि जर तो मुद्रांक भरत असेल तर लोकांना देत का नाही आणि जर तो स्टॅम्प भरत नसेल तर मात्र तो निष्क्रिय आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही आणि अशा निष्क्रिय स्टॅम्प विक्रेत्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न दुय्यम निबंधक यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी विचारला आहे
सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आंदोलनाचा इशारा 
वारंवार लोकांना मुद्रांक खरेदीसाठी गेले असता मुद्रांक मिळत नाहीत याउलट कराड , विटा याठिकाणी सहज उपलब्ध होणार स्टॅम्प कडेगाव मध्ये का मिळत नाहीत 
मुद्रांक विक्रेत्यांच्या चाललेल्या मनमानी कारभारावर कारवाई करावी त्याच बरोबर निष्क्रिय मुद्रांक विक्रेत्यांचे लायसन रद्द करावे आशा अनेक मागण्या घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे
दुय्यम निबंधक यांनी काढली नोटीस

कडेगावच्या दुय्यम निबंधक यांनी  मुद्रांक विक्रेते यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे 
मात्र जर सात दिवसात कारवाई झाली नाही तर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोनाचा इशारा दिला आहे




Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर