डमी सही आणि जाग्यावर गरिबांचा हक्क कमी | कडेगाव महावितरणचा गोंधळ चव्हाट्यावर

भ्रष्ट्राचार की पोलखोल

कडेगाव मधील महावितरण कशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांना लुटत आहे हे आता सर्वांना समजू लागलेच आहे पण मुळातच जर पाटील साहेब कोण हे जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सापडत नसतील तर मात्र नक्कीच वरिष्ठ अधिकारी सुद्धा पाटील साहेबांनी चाटलेल्या मलाईची टेस्ट बघत असावे 


वरिष्ठ गप्प का..?
एवढ्या दिवसात अजून एकही कारवाई झाली नाही वरिष्ठ अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत आत्ता यामुळे नक्कीच पाटील म्हणजे कोणीतरी मोठी हस्ती आहे असे वाटतय. पण सर्वसामान्य लोकांचा खाल्लेला पैसा हा पचत नाही असे थोर लोक सांगतात कदाचित वरिष्ठ अधिकारी वर्गाने पैसे खिशात घालून प्रकरण मॅनेज तर नाही ना केले..?

त्या पावतीवर कोणत्या अधिकाऱ्याची सही होती..?
महावितरण करून फाटलेल्या पावतीवर तपासे ह्या अधिकाऱ्याची सही आहे अशी माहिती कडेगाव महावितरणच्या साहेबांनी दिली आहे मात्र यासंदर्भात तपासे साहेब यांना विचारणा केली असता त्यांनी ही सही माझी नसून डमी सही असावी अशी शंका व्यक्त केली आहे तर त्या पावतीवर ग्राहकाची सुद्धा सही नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे 

अर्थातच कार्यालयातच एकमेकांच्या डमी सह्या मारून फसवणुकी चालल्या आहेत का..?
हा नवीन प्रश्न पुढे उपस्थित झाला आहे

Comments

Popular posts from this blog

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर

रेल्वे विभागाचा हा कसला बेजबाबदारपणा ....!

"पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायतीमध्ये पत्रकारांचा सन्मान"