संपूर्ण कार्यकर्त्यांची ईच्छा त्यांनी पंचायत लढावी अशी आहे !
स्वराज्य योध्दा प्रतिष्ठान चे संस्थापक, अध्यक्ष श्री. मनोज शिवाजीराव महाडीक यांनी रणांगणात उतरावे अशी ईच्छा
नेवरी पंचायत गणामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याकडून होते आहे, मनोज महाडीक हे नेवरीचे स्थायिक असून एक शिक्षित अभ्यासू नेतृत्व आणि तालुक्यातील त्यांचे असलेले संघटन हे वाख्यानेजोगे आहे, आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या जनसंख संघटनेच्या असलेल्या आपुलकीच्या भावनेने त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची ईच्छा त्यांनी पंचायत लढावी अशी आहे ! आटपाडी,सांगली ते कराड पर्यन्त संघटनेचा असलेला संपर्क मनोज महाडीक याना कितपत कामी येतो ही येणारी आगामी निवडणूक ठरवेल !
तालुक्यात गाव तिथे शिवजयंती साजरे करण्याचे त्यांचे कार्य असो, किंवा गडकोट मोहीम असो, सामाजिक कार्य असो की प्रशासकीय कार्य असो नेहमी तत्परतेने प्रतिसाद देणारे कार्यकर्तृत्व म्हणून त्यांचा आदर्श कडेगाव तालुक्यात आहे.
नेवरीसोबत त्यांचा बालेकिल्ला म्हणून कडेपुर, तडसर ची ओळख तालुक्यात आहे, गावासोबत गावाबाहेर असंख्य मित्रसमुदाय जोडण्याच कार्य त्यांनी गेल्या काही वर्षांत संघटनेच्या माध्यमातून केलं आहे !
Comments
Post a Comment