कॉन्ट्रॅक्टरने रस्ता पुन्हा करावा अन्यतः रस्ता JCB लावून उकरू | राहुल चन्ने यांचा इशारा
कडेगाव मधील बस स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या बाजारपेठेतुन जाणाऱ्या रस्त्याचे काम मंजूर असून यापैकी बस स्टँड ( किरण मेडिकल) पासून ICICI बँक पर्यंत रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण झाले होते
काँट्रॅक्टरचा हा निकृष्ट कारभार TLN मराठीने चव्हाट्यावर आणल्यानंतर कडेगावचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष धनंजय देशमुख (भैय्या) यांनी तात्काळ याची दखल घेत सदर काँट्रॅक्टरला नोटीस बजावली आहे कामात कोणताही हलगर्जी पणा चालणार नाही असे देखील नगराध्यक्ष यांनी ठणकावले आहे
तर नोटीसीत म्हंटल्याप्रमाणे सदरचे खड्डे बुजवून त्याचा अहवाल 48 तासात सादर करण्यात यावा अन्यथा आपणावर कार्यवाही करण्यात येईल असे ठणकावण्यात आले आहे त्यानंतर सदर कॉन्ट्रॅक्टरने तात्काळ हे खड्डे बुजले आहेत
पण खड्डे बुजवून प्रश्न सुटणार नाही अर्थातच 2 ते 3 महिन्यात जर खड्डे पडत असतील तर नक्कीच ह्या रस्त्याचा कारभार निकृष्ट आहे याला वापरण्यात आलेले डांबर कमी दर्जाचे आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने ह्या रस्त्याचे कामच पुन्हा करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे
तर हा रस्ता तात्काळ पुन्हा करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना युवासेना तालुका अध्यक्ष राहुल चन्ने यांनी दिला आहे या संदर्भातच निवेदन सुद्धा चन्ने यांनी प्रशासनाला दिले आहे त्यांनी निवेदनात म्हंटल्याप्रमाणे दिनांक 18 ऑगस्ट पर्यंत या संदर्भातच निर्णय नाही झाला तर 18 ऑगस्ट रोजी सदर रस्ता JCB लावून उकरणार असल्याचे राहुल चन्ने म्हणाले आहेत
Comments
Post a Comment