महावितरण मधल्या त्या अधिकाऱ्याचा 'तपास' केला तर ...

महावितरण मधल्या त्या अधिकाऱ्याचा 'तपास' केला तर ...

कडेगांवच्या महावितरण कार्यलयात एक भ्रष्ट आधीकारी उद्योजक व नागरिकांना कनेक्शन मिळण्यासाठी हेलपाटे मारायला लावतो. आणि काही बगलबच्यानं बेकायदेशीर मीटर व कनेक्शन देतो. हा खातो शासनाचे आणि काम करतो पैसे देणाऱ्यांचे. पैशाचा लोभी असणारा हा भ्रष्ट अधिकारी याआधी लाचलुचपत विभागाला लाच घेताना सापडला आहे. अश्या अधिकाऱ्याचा त्रास कडेगावतील सामान्य नागरिकांना होत आहे. परंतु वरिष्ठ मात्र यावर गप्प आहेत. कोणतीही चौकशी नाही. कारवाई नाही. वरिष्ठ एकमेकांवर ढकलून मोकळे होतात. त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्याचा 'तपास' करणे गरजेचे आहे. अन्यथा ही भ्रष्टाचाराची किड संपूर्ण कडेगांव तालुक्यात खाऊन टाकेल
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही

ही म्हण 100 टक्के सत्य आहे. महावितरण चा तो अधिकारी कराड येथे लाच घेताना सापडला. त्याला महावितरण ने पुन्हा रुजू केले. पण त्याची सवय मात्र जात नाही. सुरवातीला हातात पैसे घेत होता. सापडल्यावर आता तो डिजिटल पेमेंट चा उपयोग करून दुसऱ्यांच्या खात्यावर पैसे घेत आहे. फोन पे, गुगल पे च्या माध्यमातून त्याच्या जवळच्या मित्रांच्या खात्यावर पैसे घेणाऱ्या महावितरण च्या अधिकाऱ्याची भ्रष्टाचाराचे कारनामे अनेक आहेत. लाच घेताना रंगेहात पकडला गेला. परंतु अजून देखील त्याची सवय जात नाही. म्हणतात ना, जित्याच्या खोड मेल्याशिवाय जात नाही. याचीही खोड तशीच आहे. सगळे सामान्य नागरिक याला वैतागले आहेत.

मांजरिणीला दूध पिताना वाटते मला कोण बघत नाही. याला वाटते मला बघितले तरी माझे कोण वाकडे करू शकत नाही 
कडेगांव च्या महावितरण मध्ये असा एक भ्रष्ट अधिकारी आहे.जो यापूर्वी लाच घेताना रंगे हाथ पकडला गेला आहे. परंतु पुन्हा कामावर रुजू होऊन तो आपला भ्रष्ट कारभार चालवत आहे. लाच घेताना सापडून सुद्धा महावितरण ने त्याला पुन्हा नोकरीवर रुजू केले. त्यामुळे जसे मांजरिणीला दूध पिताना वाटते मला कोण बघत नाही. तसे याला वाटते मला बघितले तरी माझे कोण वाकडे करू शकत नाही. कडेगांव विभागात या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचे अनेक किस्से आहेत. बेकायदा कनेक्शन देने , ग्राहकांची कॉन्ट्रॅक्टर कर्वे वसुली करणे आणि वसुली करताना फोनपे , गुगल पे यांसारखे online पेमेंटचे पर्याय निवडून ते कराड भागातील काही व्यक्तींच्या अकाउंट वर घेणे असे प्रयोग चालू आहेत त्या व्यक्तीच्या बँक अकौंटचे स्टेटमेंट काढले तर हा सगळा प्रकार समोर येईल
यांच्यावर ठोस कारवाई होने अपेक्षित आहे अन्यथा हा भस्मासुर सर्वसामान्य जनतेचे हक्क गिळून मोकळा होईल

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर