मोठे मासे तळाला , छोटे मासे गळाला !
मोठे मासे तळाला , छोटे मासे गळाला
कडेगाव तहसील मधील अव्वल कारकून लाचलुचपतच्या जाळ्यात
गलेलठ्ठ पगार असताना जनतेकडून लाच घेणारे कावळे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारी दाताने लोकांचे लचके तोडून देशातील जनतेची पिळवणूक करत आहेत
म्हणतातना "दाम करी काम वेढ्या" अशी काहीशी परिस्थिती झालीय
कडेगाव तहसील कार्यालय नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे हिते पैसे दिले तरच काम होतात असे नागरकांच्यातून बोलले जात आहे
आणि त्याचा एक पुरावा म्हणजे काल लाचलुचपतला सापडलेला कारकून ज्याला 10 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपतने रंगे हात पकडले
पन हा झाला तो फक्त छोटा मासा
असे छोटे मासे कडेगाव तहसील कार्यालयातुन गळाला लागणे काय नवीन नाही ..
पण कडेगाव तहसील मध्ये असेही भ्रष्टाचारी मोठे मासे आहेत ते मात्र तळालाच राहिले आहेत ह्या मोठ्या माशांचं काय ..?
छोटे मासे हे वरून दिसत आहेत आणि ते सापडत आहेत पण मोठा मासा आणि म्होरक्या मात्र तळात आहे तो सापडेल का..?
गळाला लागलेल्या छोट्या माशाकडून लाचलुप विभाग म्होरक्याचा तपास करणार का ...?
कडेगाव तहसील कार्यालयात सापडलेल्या कारकुणाचा लाचलुचपत विभाग कशा प्रकारे तपास करणार यावर आता संपुर्ण तालुक्याचे लक्ष आहे , सांगली जिल्ह्याचे लाचलुचपत खात्याचे प्रमुख सुजय घाटगे आणि त्यांची टीम हे लाचलुचपतची कारवाई करण्यात नेहमीच यशस्वी राहिले आहेत त्यामुळे सम्पूर्ण महाराष्ट्रात त्यांची प्रशंसा होत आहे मात्र कडेगाव तालुक्यातील छोट्या माशाच्या धागेदोऱ्यातून म्होरक्यापर्यंत पोहोचण्यात सांगली जिल्ह्याच्या लाचलुचपतची टीम यशस्वी होणार का ? असा प्रश्न पुढे उपस्थित होत आहे
कडेगाव तहसील कार्यालयात असे मोठे मासे आहेत जे आल्यापासून अवैध्य धंद्यांना प्रत्साहन मिळत आहे , बरेच सामान्य नागरिक सुद्धा त्रस्त झाले आहेत त्यामुळे लाचलुचपत विभागाच्या कारवाई नंतर सर्वसामान्य नागरिकांनी सांगली ACB चे आभार मानले आहेत
Comments
Post a Comment