पगार मागितला म्हणून हॉटेल सुर्या मधील कामगाराला बसला चोप

पगार मागितला म्हणून हॉटेल सुर्या मधील कामगाराला बसला चोप ,कडेगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

 कडेगाव MIDC मधील सूर्या हॉटेल मध्ये  पार्ट टाईम जॉब  करत असलेल्या एका 19 वर्षीय युवकाला पगाराचे पैसे मागितले म्हणून चोप मार देण्यागत आला आहे यासंदर्भात दोन व्यक्तींविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे  याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी आदित्य गोरखनाथ अजरेकर हा ITI महाविद्यालय कडेगाव या ठिकाणी काम करत शिक्षण घेतो आणि येणाऱ्या पगारातून आपली दैनंदिनी आणि शाळेचा खर्च भागवतो दिनांक 26  सप्टेंबर रोजी रात्री 12 :15 च्या सुमारास काम आटप्ल्यानंतर आपल्या पगाराचे पैसे मागितले असता हॉटेल मालकांकडून त्याला शिवीगाळ आणि चोप देण्यात आला आहे यासंदर्भात अमर आणि अजित डांगे राहणार कराड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर 633 /2022 प्रमाणे  कलम 323 , 506 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
की शाळेत फी भरण्यासाठी हॉटेल मालकास २ महिन्याच्या पगारातील पैसे मागितले असता त्याला बेदम चोप भेटला आहे. ही घटना खरच निंदनीय आहे   

MIDC परिसरात बालकामगारांचे प्रमाण वाढले 
कडेगाव MIDC मधील हॉटेल लाईन असो किंवा अन्य व्यवसाय ह्या ठिकाणी आहेत मात्र अनेक लोक आपला व्यवसाय करताना कामगार म्हणून बालकांचा वापर करत आहेत अशा लोकांवर प्रशासनाने  गुन्हे दाखल करून कारवाई करणे गरजेचे आहे. येथे बालकामगार काम करत नाहीत. याऐवजी येथे बालकामगार काम करतात असे बोर्ड हॉटेल व बार मध्ये लावले तर काही वावगे ठरणार नाही. कारण MIDC मधील बहुतांश हॉटेल्स व बार मध्ये चिमुकले हात काम करताना दिसत आहेत दरम्यान सदर हॉटेल मध्ये बालकामगार आहेत का याची तपासणी पोलिसांनी करणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर