दिलखुश गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

दिलखुश गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
सामाजिक विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प 
      महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत.
कडेपूर येथील दिलखुश गणेश मंडळने आपल्या देशाच्या सुवर्णी महोत्सव वर्षा निमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ मध्ये ७५ज्येष्ठाचा सत्कार करुन हा सामाजिक उपक्रम गणेशोत्सव निमित्त स्तुत्य उपक्रम साजरा केल्याने समाजात एक चांगला आदर्श युवा तरुणांना दिला असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष सूरज यादव यांनी केले.
                ते कडेपूर येथील दिलखुश गणेश मंडळच्या वतीने घेण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.

              यावेळी प्रमुख पाहुणे श्री.गोकुळ गोपाळ पाटील (श्रमिक मुक्ती दल नेते सांगली) आयोजक अजित चव्हाण दत्तात्रय यादव काका, संजय यादव, लालासो यादव ,अशोक यादव ,विवेक यादव, सुर्याजी यादव,विलास यादव, सुयश यादव, संज्योत साळुंखे
 ओंकार यादव,पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ मध्ये 75 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच

कडेपूर गावातील गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला.
             पुढे ते म्हणाले उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं देखील आवश्यक गरजेचे आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन समाजात जनजागृती केल्याने तरुणांमध्ये चांगली क्रांती होईल व समाजात चांगला संदेश दिला जाईल. 

           यावेळी कडेपूर गावातील गणेश मंडळातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरीक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर