कडेगांव MIDC बनले गुन्हेगारांचे घर
कडेगांव MIDC बनले गुन्हेगारांचे घर
कडेगांव शहरापासून 3 किमी अंतरावर असणारी कडेगांव MIDC ही गुन्हे करणाऱ्या लोकांचे घर बनले आहे याठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून चोरी, मारामारी, अंमली पदार्थांची विक्री, वैश्या व्यवसाय याठिकाणी राजरोज होत आहेत. चोरीच्या घटनांनी स्थानिक उद्योजकांना हैराण केले असून चोरांचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.
शाळा शिकत काम करणाऱ्या तरुणाला जेंव्हा मोबदला मागताना पगाराच्या ऐवजी चोप बसतो !
कडेगाव मधील ITI कॉलेज येथे अनेक युवक प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात शिकायला आलेले विद्यार्थी काही स्थानिक असतात तर काही लांबून आलेले असतात ज्यांना रोजचे ये-जा करणे शक्य नसते ते विद्यार्थी तिथेच राहतात, तर काही विध्यार्थी परिस्थिती अभावी स्वतः काम करून शिकत असतात,पण जेव्हा एखादा युवक घर सोडून बाहेर राहतो तेंव्हा त्या ठिकाणचे लोक त्याला नवीन असतात तेथे त्याच्या ओळखीपाळखीचे कोणी नसते अशातच तो एखाद्या ठिकाणी शिक्षण घेत घेत काम करतो पण जर काम करत असलेल्या ठिकाणी त्याची जेंव्हा पगार द्यायची वेळ येते तेंव्हा पगाराच्या जागी फुकटचा चोप बसतो खरच मनाला लागेल अशी दुर्दैवी परिस्थिती आहे न ! असाच काहीसा प्रकार काल रात्री कडेगाव MIDC परिसरात घडला आहे MIDC परिसरात असलेल्या ITI महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला एक युवक जो काम करत शिक्षण घेत आहे आपली दैनंदिनी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी तो MIDC मधील सूर्या हॉटेल मध्ये पार्ट टाईम जॉब करत होता. मात्र शाळेत फी भरण्यासाठी हॉटेल मालकास २ महिन्याच्या पगारातील पैसे मागितले असता त्याला बेदम चोप भेटला आहे. ही घटना खरच निंदनीय आहे दरम्यान सदर युवकाने यासंदर्भात तात्काळ पोलीस हेल्पलाईन नंबर वर कळवले असून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे.
MIDC परिसरात बालकामगारांचे प्रमाण वाढले
कडेगाव MIDC मधील हॉटेल लाईन असो किंवा अन्य व्यवसाय ह्या ठिकाणी आहेत मात्र अनेक लोक आपला व्यवसाय करताना कामगार म्हणून बालकांचा वापर करत आहेत अशा लोकांवर प्रशासनाने गुन्हे दाखल करून कारवाई करणे गरजेचे आहे. येथे बालकामगार काम करत नाहीत. याऐवजी येथे बालकामगार काम करतात असे बोर्ड हॉटेल व बार मध्ये लावले तर काही वावगे ठरणार नाही. कारण MIDC मधील बहुतांश हॉटेल्स व बार मध्ये चिमुकले हात काम करताना दिसत आहेत.
कडेगाव पोलिसांची तत्परता ?
कडेगाव MIDC परिसरातील सुर्या हॉटेल मध्ये पगार मागितला म्हणून कामगाराला मारहाण करण्यात आली शिवाय शिवीगाळ करण्यात आली अशी महिती मारहाण झालेल्या युवकाने TLN मराठीला दिली आहे
तर त्याने सांगितल्याप्रमाणे सदर हॉटेल मध्ये मारहान करताना त्याच्यावर लोखंडी सळीने धावून आल्याचे सांगितले आहे तसेच जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे दरम्यान घटना घडल्यानंतर काही वेळात त्या युवकाने पोलीस हेल्पलाईन नंबर वर फोन करून घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर कडेगावचे कर्तव्यदक्ष पोलीस तात्काळ याठिकाणी जाऊन घडलेला प्रकाराची महिती घेतली आहे
ओळख ना पाळख तुटपुंज्या पैशासाठी गुन्हेगारी लोकांना खोली भाड्याने देणारे खोली मालक
काही स्थानिक लोकांनी MIDC परिसरात खोल्या भाड्याने दिल्या आहेत. परंतु त्या देताना त्या व्यक्तीची कोणतीही माहिती तस3च ओळखपत्र खोलीमालक घेत नाहीत. आणि पुढे जाऊन असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे भाडेकरू गुन्हा करून जातात व खोलीमलक हात वर करतात. अश्या बेकायदेशीर पणे खोल्या भाड्याने देणाऱ्या खोलीमालकांवर देखील कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.
परप्रांतीयांना चाकू दाखवून लुटणारी चोरी सक्रिय
कडेगांव MIDC मध्ये रात्रीचे परप्रांतीय कामगारांना चाकू दाखवून, धमकावून व मारहाण करून पैसे व मोबाईल घेऊन जाणारी टोळी सक्रिय झाली आहे. यांच्यावर लक्ष ठेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
Comments
Post a Comment