Midc कडेगांव मधील हॉटेल्स मध्ये बालकामगार ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार का ?
Midc कडेगांव मधील हॉटेल्स मध्ये बालकामगार ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार का ?
कडेगांव midc बंद पडक्या अवस्थेत असली तरी midc मधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 166e गेला असल्याने या हायवे कडेला अनेक हॉटेल्स लॉज व बार झाले आहेत. अश्या हॉटेल्स मध्ये काम करण्यासाठी कमी पैशात जास्त काम करणारे मजूर म्हणजे बालकामगार सहज भेटतात. कारण याठिकाणी ITI कॉलेज जवळचं आहे. तसेच MIDC असल्याने कामाच्या शोधात अनेक कुटुंबे याठिकाणी वास्तव्यास आहेत. याच संधीचा फायदा घेऊन हॉटेल मालक बालकामगाराणा टार्गेट करत आहेत. यांना पगार व पैशाचे आमिष दाखवून राबवून घेतात. आणि पगार देतेवेळी दमदाटी करून मारहाण करतात. अश्या हॉटेल मालकांवर कोणाचाही अंकुश नाही. प्रशासन आणि शासन यांचे साफ दुर्लक्ष आहे. यामुळे बालकामगारांवर होणारे अत्याचार वाढले आहेत.
याचेच एक उदाहरण म्हणजे सूर्या हॉटेलमधील एका कामगाराला पगाराचे पैसे मागितले म्हणून मालकानेच मारहाण केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून तत्परतेने रात्रीच त्या मुलाला संरक्षण दिले. व गुन्हा दाखल केला. परंतु प्रश्न हा आहे की, अश्या बालकामगार ठेवणाऱ्या हॉटेल मालकांवर कारवाई का होत नाही ? काही हॉटेल मालक तर एवढे मग्रूर आहेत की ते पोलिसांना सुद्धा भीत नाहीत. तर असे बोलले जात आहे की, काही पोलिसचं हॉटेलमध्ये पार्टनर आहेत. त्यामुळे कारवाई होऊ शकत नाही. असे हॉटेल मालक जर कामगारांना मारहाण करत असतील तर सामान्य नागरिक म्हणून या हॉटेलमध्ये जावे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
लॉज वर वेश्या व्यवसाय वाढला
लॉज म्हणजे तात्पुरते राहण्याचे ठिकाण. विश्रांतीचे ठिकाण. कडेगांव midc व परिसरात असणारे लॉज हे आता विश्रांती चे नाहीतर वासनेचे ठिकाण झाले आहे. या राहण्याच्या जागांवरती आता वैश्या व्यवसाय सुरू झाला आहे. कॉलेजमधील नाबालिक मुले व मुली याठिकाणी येत आहेत. यावर कोणाचाही अंकुश राहिला नाही.
Comments
Post a Comment