RTO अधिकाऱ्यांनी जादा पैसे मागितले अथवा घेतले तर आता त्यांचेचं कपडे काढून फटके देवू ! : प्रमोद मांडवे | RPI चे RTO कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
🔸 आरपीआय व शेतकरी संघटनेचे सांगली RTO समोर आंदोलन RTO अधिकाऱ्यांनी जादा पैसे मागितले अथवा घेतले तर आता त्यांचेचं कपडे काढून फटके देवू : प्रमोद मांडवे सोमवार दि. ३१ रोजी वाहन नोंदणी व चालक परवाना शिबीर कडेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांनी RTO अधिकारी व एजंट यांना शासकीय फी व्यतिरिक्त जादा पैसे देऊ नये. कोणी जादा पैसे घेतले अथवा मागितले तर आपल्याला संपर्क करावा. त्या लाच मागणाऱ्या RTO अधिकाऱ्याला त्याचे कपडे काढून फटके देऊ असे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी सांगितले. मागील शिबिरावेळी कडेगांव येथे ट्रॉली पासिंग करण्यासाठी लाच मागितल्यावर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी स्वतःची कपडे काढून देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले होते. यानंतर विविध संघटनांनी सदर प्रकरणी RTO अधिकाऱ्यांचा कडेगांव येथे हार घालून सत्कार केला. व घोषणाबाजी केली. सदर प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालेनंतर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणलेचा गुन्हा RTO अधिकाऱ्यांनी कडेगांव पोलीस ठाणेमध्ये दाखल केला. त्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त भावना दिसून आल्या