RTO अधिकाऱ्यांनी जादा पैसे मागितले अथवा घेतले तर आता त्यांचेचं कपडे काढून फटके देवू ! : प्रमोद मांडवे | RPI चे RTO कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

🔸 आरपीआय व शेतकरी संघटनेचे सांगली RTO समोर आंदोलन

RTO अधिकाऱ्यांनी जादा पैसे मागितले अथवा घेतले तर आता त्यांचेचं कपडे काढून फटके देवू : प्रमोद मांडवे

सोमवार दि. ३१ रोजी वाहन नोंदणी व चालक परवाना शिबीर कडेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांनी RTO अधिकारी व एजंट यांना शासकीय फी व्यतिरिक्त जादा पैसे देऊ नये. कोणी जादा पैसे घेतले अथवा मागितले तर आपल्याला संपर्क करावा. त्या लाच मागणाऱ्या RTO अधिकाऱ्याला त्याचे कपडे काढून फटके देऊ असे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी सांगितले. मागील शिबिरावेळी कडेगांव येथे ट्रॉली पासिंग करण्यासाठी लाच मागितल्यावर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी स्वतःची कपडे काढून देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले होते. यानंतर विविध संघटनांनी सदर प्रकरणी RTO अधिकाऱ्यांचा कडेगांव येथे हार घालून सत्कार केला. व घोषणाबाजी केली. सदर प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालेनंतर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणलेचा गुन्हा RTO अधिकाऱ्यांनी कडेगांव पोलीस ठाणेमध्ये दाखल केला. त्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त भावना दिसून आल्या. आरपीआय, शेतकरी संघटना, शिवशक्ती फाउंडेशन, शिवसेना, मनसे  व कडेगांव तालुक्यातील विविध समाजिक संघटनांनी एकत्र येत कडेगांव येथे लाक्षणिक आंदोलन केले. आता उद्या दि. ३१ रोजी RTO चे शिबीर कडेगांव येथे होत असल्याची माहिती असल्याने त्याअनुषंगाने RTO अधिकारी यांनी आता लाचखोरी थांबवावी नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांचा बिमोड करू असे प्रमोद मांडवे म्हणाले.

पुन्हा एकदा ३५३ लागले तरी चालेल पण नागरिकांची पिळवणूक होऊन देणार नाही : प्रमोद मांडवे

भ्रष्टाचाराची लागलेली कीड संपवण्यासाठी आम्ही तत्पर असून लोकांसाठी काम करताना पुन्हा एकदा 353 कलम लागले तरी चालेल पण नागरिकांची पिळवणूक होऊन देणार नाही. प्रशासन व प्रस्थापित राजकिय पुढारी मिळून माझे सामाजिक काम थांबावे यासाठी माझ्यावर खोट्या केसेस करत आहेत. पण मी थांबणार नाही. कितीही 353 लावले तरी मी व्यवस्थेच्या विरोधात भांडत राहणार असे प्रमोद मांडवे म्हणाले.
🔸 आरपीआय व शेतकरी संघटनेचे सांगली RTO समोर आंदोलन
कडेगांव RTO लाचमागणी प्रकरणी RTO अधिकाऱ्यांचा वर गुन्हा दाखल करणेच्या मागणीसाठी RTO कार्यालय सांगली समोर



रिपब्लिकन पक्ष, शेतकरी संघटना यांचे उद्या सांगली RTO कार्यालय समोर ठिय्या  आंदोलन :
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

कडेगाव लाच मागणी प्रकरणातील दोषी RTO अधिकारी, कंत्राटी कर्मचारी यांचेवर निलंबनाची कारवाई व खंडणी, लाचलुचपत चा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए-आंबेडकर) पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष, मा.महादेव होवाळ व शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा युवा अध्यक्ष, मा.विजय माळी नेतृत्वाखाली उद्या सोमवार दि.३१/१०/२०२२ रोजी सांगली RTO कार्यालय समोर "ठिय्या आंदोलन" करण्यात येणार आहे. कडेगाव लाच मागणी प्रकरणा मध्ये ट्रॉली पासिंग साठी दहा हजार रुपयाची लाच मागणी केलेले सबळ पुरावे असताना वरिष्ठ अधिकारी दोषी RTO  अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत कर्तव्य कसूर केली आहे. प्रकरण उघडकिस आणणारे सामाजिक कार्यकर्ते मा.प्रमोद मांडवे यांचेवर ५ (पाच) दिवसानंतर 353 (शासकीय कामात अडथळा) गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये RTO अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर केला आहे. त्यामुळे RTO वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दोषी  लोकांवर तात्काळ कारवाईची पाऊले उचलली नाहीत, म्हणून उद्या सांगली RTO कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे आरपीआय युवा अध्यक्ष रुपेश कांबळे यांनी माहिती दिली.

एजंटनी अधिकाऱ्यांचे वसुली एजंट बनू नये नाहीतर त्यांच्यावर लाचलुचपत विभागाचा ट्रॅप लावणार : प्रमोद मांडवे

RTO अधिकारी एजंटकरावी नागरिकांकडून पैसे वसूल करत आहेत. यामध्ये अधिकारी सापडू नये यासाठी एजंटना पैसे घेण्यासाठी पुढे करत आहेत. एजंटणी कायदेशीर फी आणि कायदेशीर सेवा शुल्क घ्यावे. लाचलुचपत विभागाचा ट्रॅप आम्ही लावणार आहे. यामध्ये जास्तीचे पैसे मागितले अथवा घेतल्यास एजंट पकडला गेल्यास आम्ही जबाबदार नाही. असे प्रमोद मांडवे म्हणाले

     



Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर