सोनहीरा कारखान्याने माझे पैसे मला द्यावे नाहीतर मी बायकपोरांसह आत्मदहन करणार ! काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मोरे यांनी दिला आत्मधनाचा इशारा

सोनहीरा कारखान्याने केलेल्या बेकायदेशीर कपातीचा विरोधात काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मोरे यांनी दिला आत्मधनाचा इशारा


कार्यकर्ता मोठा झाला तर नेता मोठा होत असतो आणि नेता मोठा झाला की कार्यकर्ता ही साखळी अशाच पद्धतीने चालू आहे ..
मोठ्या नेत्यांचा छोटा कार्यकर्ता जरी असला त्याने आपल्या नेत्यांसाठी केलेलं काम खूप मोठे असते ! आज नेता आणि कार्यकर्ता यांच्यामागे लिहिण्याचे कारण म्हणजे कडेगाव तालुक्यातील घडलेला हा प्रसंग ! 
वस्तुतः नेत्याने सर्वांना सोबत घ्यायचे, अडी-अडचणीच्या काळात मदत करायची. सुख-दुःखात सोबत करायची. मग कार्यकर्त्यांनी नेत्यासाठी काम करायचे, प्रत्येकवेळी नेत्याने आवाज दिला की हजर राहायचे  आतापर्यंत चालत आलेली ही पद्धत आहे 
मात्र याउलट नेता आणि कार्यकर्ता यांच्यातील भावनिक दरी कमी होऊ लागली आहे.
 त्याला कारणही तसेच आहे. कार्यकर्त्याला संधी देण्याऐवजी घरातील व्यक्तीलाच पद देऊ अशी असलेली नेत्यांची भावना असो किंवा एखादा दुजाभाव
 त्यामुळे कार्यकर्ते दुरावतात आणि नेते पुन्हा जमिनीवर येतात.
कडेगाव तालुक्यात ताकारी आणि टेंबू योजनेचे पाणी आले आणि कडेगावचे नंदनवन झाले आणि याच श्रेय कोणा एकट्याला देता येणार नाही कारण लोकनेत्यांनी असो  किंवा अधिकाऱ्यांनी अशा सर्वांच्या मदतीतून हे पाणी आलं मग या पाण्यासाठी कॅनॉल मध्ये उतरून खोर पाटीने काम करणारा कामगार असुदे ..
आज तालुक्यातील बरेच लोक बंगलो बांधून चारचाक्या घेऊन फिरत आहेत या पाण्याच्या जोरावर दरम्यान महाराष्ट्रात उच्च स्थरावर असलेल्या सोनहीरा कारखान्याच्या निर्मिती मुळे खऱ्या अर्थाने लोकांना आधार भेटला मात्र ह्या कारखान्याला ज्याने ऊसाची पहिली मोळी टाकली त्या माणसाला आत्महत्या करण्याची वेळ का बरं येते..? 

सोनहीरा कारखान्याला ज्यान पहिली मोळी टाकली त्याला आत्मदहन  करण्याची वेळ का आली आहे

कडेगाव तालुक्यातील आमरापूर येथील  कदम घराण्याचे निष्ठावंत शिलेदार राजाराम मोरे यांनी चक्क सोनहीरा कारखान्याच्या विरोधात बंड पुकारले असून आत्मदहन करू असा इशारा सुद्धा दिला आहे राजाराम मोरे हे काँग्रेस गटाकडून सोसायटीचे माजी चेअरमन होते शिवाय त्यांच्या पत्नी सुद्धा अमरापूर सर्व सेवा सोसायटीच्या माजी चेअरमन होत्या म्हणजे अर्थातच 10 वर्षे सोसायटीच्या सत्तेत शिवाय सोनहीरा सहकारी साखर कारखाना स्थापन झाला तेंव्हा पहिली मोळी सुद्धा यांचीच होती पण आज यांनी कारखान्याच्या विरोधात बायकापोरांसह आत्मदहन करू असा इशारा दिलाय म्हणजे कारण पण नक्कीच काहितरी असणार किंवा नेत्या सोबत बिनसले असणार यावर बोलताना मात्र मोरे यांनी आपल्या सुद्धा रक्तात कॉंग्रेस आहे आणि आपण अजूनही विश्वजित कदम यांचेच कार्यकर्ते आहोत असे प्रतिपादन केले आहे
का दिला मोरे यांनी आत्मधनाचा इशारा ?

माझी ऊसतोडणी यंत्रणेची बेकायदेशीर कपात केली आहे आणि म्हणून मी आत्मदहन करणार आहे बाळासाहेबांना भेटलो , बापूंना भेटलो MD साहेबांना भेटलो पण मला कोणीही मदत नाही फक्त आश्वासन दिले आता मला पर्याय नाही मी कुटुंबासहित आत्मदहन करणार आहे असे मोरे म्हणाले आहेत शिवाय आम्हा कार्यकर्त्यांकड़े लक्ष देत नाहीत जनतेच काय असे देखील ते म्हणाले 

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर