सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांच्यावर जबरदस्तीने 353 चा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या आर.टी.ओ. प्रशासनाच्या निषेधार्थ उद्या कडेगाव तहसिल कार्यालयावर रिपब्लिकन पक्ष व शेतकरी संघटनेचे निदर्शने आंदोलन...


======================
सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांच्यावर जबरदस्तीने 353 चा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या आर.टी.ओ. प्रशासनाच्या निषेधार्थ उद्या कडेगाव तहसिल  कार्यालयावर रिपब्लिकन पक्ष व शेतकरी संघटनेचे निदर्शने आंदोलन...
======================
 कडेगाव :- कडेगाव येथे दिनांक १२/१०/२०२२ रोजी  झालेल्या आर.टी.ओ. कॅम्प मध्ये ट्रॉली पासिंगसाठी आलेले शेतकरी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांना रु. १०,०००/- (दहा हजार रुपय)ची लाच ट्रॉली पासिंग साठी मागणी करण्यात आली होती, लाच देण्याला प्रमोद मांडवे यांनी विरोध दर्शवला व आर.टी.ओ.च्या भ्रष्ट कारभारावर कॅम्पच्या ठिकाणी घोषणाबाजी केली.... याबाबतचे योग्य पुरावेआहेत  त्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी व्हायरल झाली.
      या बाबत रिपब्लिकन पक्ष व शेतकरी संघटना यांचे वतीने दुसऱ्या दिवशी तत्काळ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांना निवेदन देऊन लाच मागणी प्रकरणाची  सखोल चौकशी करून कंत्राटी कर्मचारी जयंत पाटिल यांच्यासह,श्री सासणे व श्री भंडारे या अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात दोषी ठरवून त्यांच्यावरती तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली होती....
 आम्ही केलेल्या मागणीची कार्यवाही न करता सोशल मीडियावर संपूर्ण महाराष्ट्रात सांगली आर.टी.ओ. ची बदनामी होत असल्याचे पाहिल्यावर सांगली आर.टी.ओ. अधिकाऱ्यांनी  पाच दिवसानंतर अधिकाराचा गैरवापर करून जोर जबरदस्तीने कडेगाव पोलीस स्टेशन मध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांचेवर 353 चा गुन्हा दाखल केला आहे.
 यावरुन असे लक्षात येते की लाच मागणी करणारा दोषी कंत्राटी कर्मचारी व बरोबर असणारे अधिकारी यांना पाठीशीघालण्याचा प्रकार होत  आहे...
 या घटनेच्या निषेधार्थ व प्रमोद मांडवे यांच्यावरील खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यासाठी आणि लाच मागणी प्रकरणातील दोषी कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांचे व खंडणीचा,लाचलुचपतचा  गुन्हा दाखल करून त्यांच्या निलंबनासाठी उद्या गुरुवार दि.२०/१०/२०२२२ रोजी कडेगाव तहसिल कार्यालय समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए-आंबेडकर) कडेगाव तालुका व शेतकरी संघटना कडेगाव तालुका तसेच इतर सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष, मा.महादेव होवाळ. व शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष, मा.विजय माळी तसेच इतर सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत....
======================
        

Comments

Popular posts from this blog

सरपंचांसहित गाव बसले उपोषणाला..कडेगाव तालुक्यातील घटना..

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला.

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर