सुर्ली घाटाच्या रस्त्याचा उदघाटन समारंभ संपन्न
पाणी संघर्ष समिती व हिंद केसरी फाऊंडेशन सुरली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाच्या लढ्याची दखल घेऊन सुरली घाट रस्ता पूर्ण झाला.
घाट रस्ता डांबरीकरण आणि ओगलेवाडी रेल्वे पूल रस्ता डांबरीकरण या दोन्ही कामाचा भव्य शुभारंभ सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री निवास पाटील साहेब व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री व कराड उत्तर चे लोकप्रिय आमदार मा.बाळासाहेब पाटील यांचे शुभहस्ते पार पडला.
यावेळी उपस्थित हिंद केसरी संतोष वेताळ, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी ऐस देशमुख, अभिमन्यू वरूडे, प्रशांत यादव, सरपंच दत्तात्रय वेताळ, जीवन करकटे, प्रविण करडे, शिवलिंग सोनवणे,युवा नेते नवनाथ पाटील, उपसरपंच राजश्री वेताळ ग्रामपंचायत सदस्य संतोष माने व सुदेश वेताळ, विजय अटकरे सरपंच कामती, सचिन मदने तंटामुक्तीचे अध्यक्ष अमोल भोगे, माजी सरपंच जयसिंग पाटील, आप्पा पैलवान, भीमराव ढमाले, खाशाबा वेताळ दादा, प्रल्हाद वेताळ दादा, अमित फुके, माजी उपसरपंच कृष्णत मदने सोनू मदने कामतीचे सरपंच विजय आतकरे सैदापूर सरपंच फत्तेसिंग जाधव दिगंबर डांगे अधिक सुर्वे सह्याद्री कारखाने संचालक रामदास पवार प्रमोद पाटील फौजी उपस्थित होते.
गेले दोन वर्षे वनविभागाच्या चुकीच्या धोरणांमुळे सुरली घाटाचे काम रखडले होते व सर्व प्रवाशांना घाटातील खड्ड्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत होता , पाणी संघर्ष समिती व हिंद केसरी फाऊंडेशन सुरली यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन खासदार श्री. निवास पाटील,व आमदार बाळासाहेब पाटील यांनी केंद्रात पाठपुरावा करून रस्त्याचे काम मार्गी लावले त्याबद्दल प्रवासी व नागरिकांच्या मनात समाधान व्यक्त केले होत आहे.
Comments
Post a Comment