साताऱ्यातील आय कॅन इन्स्टिट्यूटच्या मॅनेजर गोरे याला 1 कोटी 68 लाखाची फसवणूक केल्याप्रकारणी अटक
साताऱ्यातील आय कॅन इन्स्टिट्यूटच्या मॅनेजरला एक कोटी 68 लाखाची फसवणूक केल्याप्रकारणी अटक करण्यात आली आहे
सातारा शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे साताऱ्यातील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे मॅनेजर गजानन दत्तात्रय गोरे यांने इतर तिघासोबत मिळून तब्बल एक कोटी 68 लाख रुपयांची क्लास मालकाची फसवणूक केल्याची तक्रार झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तात्काळ त्याला अटक केली आहे याबाबत नवनाथ बाळासाहेब देशमुख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तक्रारदार देशमुख हे 2007 पासून क्लासेस चालवतात संशयित गोरे हा 2016 पासून देशमुख यांच्या क्लासमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे
ग्राहकांना माहिती देणे त्यांच्याकडून पैसे घेणे त्याचबरोबर कार्यालयीन बिली सांभाळणे बोरेकडे कामे होती 2021 मध्ये तळेगाव दाभाडे येथे तक्रारदार देशमुख यांनी आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निवास शाखा सुरू केली आणि त्यासाठी गजानन गोरे याला तिथे पाठवले क्लास साठी देशमुख यांनी गोरे याला दहा लाख रुपये खात्यावर व इतर काही रोख रक्कम दिली होती तर तेथे गोरे यांनी विद्यार्थ्यांकडून 40,000 प्रमाणे ट्युशन चे पैसे घेतले शाखा सुरू झाल्यानंतर दरवर्षी गोरे आणि त्याचा हिशोब देणे गरजेचे होते त्यानंतर वर्षाचा हिशोब मागितल्यानंतर गोरे यांनी टाळाटाळ केली तक्रारदार देशमुख यांनी माहिती घेतल्यावर गोरे याने पावती बिलाचा गैरवापर केल्याचे तेही कोणत्याही अधिकार नसताना समोर आले विद्यार्थ्यांना जुन्या कलासेसच्या नावाने पावतीबिल तयार करून दिल्याचे देशमुख यांनी सांगितले या संदर्भाची सविस्तर तक्रार देशमुख यांनी दिल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी गोरे याला तात्काळ अटक केली आहे पुढील तपास सातारा पोलीस करत आहे
Comments
Post a Comment