कडेगाव मध्ये अवैध्य मटका तेजीत... अवैध्य धंद्याला पाटबळ नक्की कोणाचे..?
कडेगाव मध्ये अवैध्य मटका तेजी
कारवाई होणार की नाही...?
कडेगाव शहरासह तालुक्यात अवैध्य मटका व्यावसाय जोमात चालू आहे..
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 6 ते 7 लोक मटका बुकी चालवत आहेत मात्र कडेगाव पोलीस ठाण्याकडून किंवा प्रशासनाकडून कारवाई होणार कधी असा सवाल उपस्थितीत होत आहे अवैध्य मटका व्यवसायामुळे अनेक घरे याआधी उध्वस्त झाली आहेतचं दरम्यान काही दिवसापूर्वी कडेगाव पोलीस ठाण्यासमोर अवैध्य धंदे बंद करावे यासाठी चळवळीतील लोकांनी आंदोलने सुद्धा केली मात्र यानंतर कारवाई होऊन मटका बंद होणे अपेक्षित होते मात्र असे काही झाले नाही याला पाटबळ नक्की कोणाचे आहे...?
पोलिसांच्या सहमतीने हे अवैध्य धंदे चालू आहेत का असा प्रश्न पुन्हा उपस्तित होत आहे दरम्यान कडेगाव तालुक्यातील प्रतिष्ठित लोक मटका बुकी चालवत असल्याची माहिती TLN मराठीच्या गोपनीय सूत्रांमार्फत मिळाली आहे
आता हा मटका बंद होणार कधी आणि पोलीस कारवाई करणार का यावर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे
दरम्यान सर्वाधिक कडेगाव शहरात अवैध्य मटका तेजीत असल्याची चर्चा आहे
पालकमंत्री महोदय हिकडे लक्ष द्याल का..?
सांगली जिल्ह्याचे पालखीमंत्री ना. सुरेश खाडे हे सध्या कामगारांचे मंत्री आहेत मात्र कडेगाव तसेच संपूर्ण जिल्यात अवैध्य धंदे तेजीत असल्याने सर्वसामान्य लोकांनी मजुरी करून कमवून आणलेले पैसे मटक्याच्या हव्यासापोटी जातं आहेत बुकी मालक गबडगंज होत चाललेले असताना सर्वसामान्य मात्र अधोगतीच्या दिशेने चालले आहेत केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे त्याच बरोबर ग्रहमंत्री सुद्धा भाजपचे असल्या कारणांने हे अवैध्य धंदे बंद करावे अशी मागणी लोकांनी केली आहे
Comments
Post a Comment