अन मुरुमाच्या आड दडली माती..! रेल्वे प्रशासन काय करणार..?
तारगाव टकले हद्दीत बॅलन्स वर्कचे काम चालू असून रेल्वे प्रशासनाने नेमलेले कॉन्ट्रॅक्टर हे काम करीत आहेत मात्र खरंच ह्या कामात दर्जा आहे का ओ..?
सातारा जिल्ह्याचा बहुतांश पट्टा तसा पावसाचाच अर्थातच सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात चांगला पाऊस पडतो उपवाद वगळता मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळ खचू शकतात दरम्यान जेंव्हा रेल्वेचे काम चालू असेल तेंव्हा ते दर्जेदार होणे गरजेचे असते
सातारा जिल्ह्यातील तारगाव टकले दरम्यान आणि तिथून पुढेही रेल्वे दुहेरीकरणाच्या बॅलन्स वर्कचे काम चालू आहे मात्र या ठिकाणी आपण वेळोवेळी बातम्याच्या माध्यमातून काम कसे चालू आहे हे तर प्रसिध्द केलेच मात्र पत्रकार हा बातमी देत असतो सत्य परिस्थिती मांडत असतो पण प्रशासनाचे अधिकारी जनतेचे पैसे योग्य ठिकाणी वापरले जातं आहेत का हे तपासात असतात पण भ्रस्टाचार कुटून भरलेले काही नितिवंतांना हे लक्षातच नसते कारण त्यांच्या नसात भराष्ट्राचारं भरलेला असतो
दरम्यान टकले जवळ माती टाकल्याचा प्रकार उघड येताच संबंधित कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी आत्ता तोळेजंग मुरूम टाकला आहे खरे मात्र मुरूम वरून पडला तरी माती आत दडून गेलीच ना..याकडे कोण लक्ष देणार
चोर सोडून संन्याशाला फाशी...!
आजकाल चोर सोडून सन्याशाला फाशी असाच सर्वत्र चालले असताना बातमीदारानंवरसच दबाव आणण्याचे काम चालू आहे मात्र हम तो कबसे जानं हतेलीपे लेके बैठे है साला कोई लेताही नही!
या उक्तीप्रमाने पत्रकार काम करीत आहेत
दरम्यान पत्रकारांकडून हा प्रकार वरिष्ठ अधिकारी पाकरे साहेब यांना कळवल्यानंतर त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे खरे मात्र प्रत्येक्षात काय होईल याकडे आत्ता लक्ष लागून राहिले आहे
दरम्यान भूसंपादनापासून चर्चेत असलेले हितले अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणी समाजातून केली जातं आहे
वापरण्यात येणारे सिमेंट कोणते..?
सदर कामात वापरण्यात येणारे सिमेंट कोणते आहे opc का ppc याची माहिती रेल्वे विभागाने समोर स्पष्ट करण्याची मागणी आत्ता सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे
Comments
Post a Comment