Posts

अन मुरुमाच्या आड दडली माती..! रेल्वे प्रशासन काय करणार..?

Image
तारगाव टकले हद्दीत बॅलन्स वर्कचे काम चालू असून रेल्वे प्रशासनाने नेमलेले कॉन्ट्रॅक्टर हे काम करीत आहेत मात्र खरंच ह्या कामात दर्जा आहे का ओ..? सातारा जिल्ह्याचा बहुतांश पट्टा तसा पावसाचाच अर्थातच सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात चांगला पाऊस पडतो उपवाद वगळता मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळ खचू शकतात दरम्यान जेंव्हा रेल्वेचे काम चालू असेल तेंव्हा ते दर्जेदार होणे गरजेचे असते सातारा जिल्ह्यातील तारगाव टकले दरम्यान आणि तिथून पुढेही रेल्वे दुहेरीकरणाच्या बॅलन्स वर्कचे काम चालू आहे मात्र या ठिकाणी आपण वेळोवेळी बातम्याच्या माध्यमातून काम कसे चालू आहे हे तर प्रसिध्द केलेच मात्र पत्रकार हा बातमी देत असतो सत्य परिस्थिती मांडत असतो पण प्रशासनाचे अधिकारी जनतेचे पैसे योग्य ठिकाणी वापरले जातं आहेत का हे तपासात असतात पण भ्रस्टाचार कुटून भरलेले काही नितिवंतांना हे लक्षातच नसते कारण त्यांच्या नसात भराष्ट्राचारं भरलेला असतो  दरम्यान टकले जवळ माती टाकल्याचा प्रकार उघड येताच संबंधित कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी आत्ता तोळेजंग मुरूम टाकला आहे खरे मात्र मुरूम वरून पडला ...

रेल्वे विभागाचा हा कसला बेजबाबदारपणा ....!

Image
रेल्वे विभागाचा हा कसला बेजबाबदारपणा .... एकीकडे  रेल्वे रूळ खचून  अपघात  होतानाच्या घटना  काय  नवीन  नाहित मात्र हे अपघात  होतात कशामुळे...? हो त्याला कारण  आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव टकले  येथील  रेल्वे दुहेरीकरणाच्या बॅलेन्स वर्कचे काम  चालू  आहे त्यानुसार भरावा  टाकण्यात आला आहे मात्र बऱ्याच  ठिकाणी  मुर्माच्या नावाखाली संबंधित कॉन्ट्रॅक्टर कंपनीकडून  माती टाकण्यात आली आहे  रेल्वेची  अधिकारी  याला सामील असल्याची चर्चा चालू  असतानाच  रेल्वे प्रशासनाचा  आणखी  एख मुजोरपणा  समोर  आला आहे एकीकडे माती टाकून कामाची  माती केल्याचा प्रकार घडला  असताना सदर कामाची  चौकशी  करण्यात यावी यासंदर्भातचे  निवेदन वंचित बहुजन  आघाडीकडून सातारा रेल्वे विभागाच्या संबंधित अभियांत्रिकी विभागात  देण्यासाठी  गेले असता पत्रकारांच्या उपस्थितीतही हे निवेदन स्वीकारण्यात आले  नाही याउलट ...

एका गरीब घरातील मुलगी जेव्हा अधिकारी अनिशा महादेव मदनेची महसूल सहाय्य्क पदी निवड

Image
एका गरीब घरातील मुलगी जेव्हा अधिकारी बनते   कराड तालुक्यातील मौजे संजय नगर शेरे  येथील मदने कुटुंबामध्ये  जन्माला आलेली  अनिशा महादेव मदने  हिची नुकत्याचं झालेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये  महसूल सहाय्यक या पदी निवड झाली आहे   एका सर्वसामान्य कुटुंबातून  हालाकीचे जीवन जगत  कुटुंबाने तिच्या सांभाळ केला  मात्र त्याचे चीज या मुलीने करून दाखवले  अपार बुद्धिमत्ता  आणि मेहनत यामुळे तिने हे यश मिळवले  तिच्या या यशामुळे  संपूर्ण कुटुंबाची मान  उंचावली गेली आहे  दरम्यान कुटुंबाने  पांडुरंगाकडे  आशीर्वाद मागत  पांडुरंगाचे देखील आभार मानले   त्याचबरोबर  आई वडील बहिण भाऊ  यांच्यासह  अशोक आडके महाराज  यांनी देखील  तिला पेढे भरवत  पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तिच्या अधिकारी होण्याने संपूर्ण संजय नगर मध्ये जल्लोषाचे वातावरण आहे

शेतकऱ्यांना आता कर्जमाफी द्या,तडसर सोसायटीने कर्ज वसुली थांबविण्याचा राज्यातील पहिली ठराव घेतला

Image
शेतकऱ्यांना आता कर्जमाफी द्या,तडसर सोसायटीने कर्ज वसुली थांबविण्याचा राज्यातील पहिली ठराव घेतला  चेअरमन प्रविण पवार यांची माहिती    कडेगाव : प्रतिनिधी         सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे ऊसतोडणी सुरू आहे. तर बहुतांश ऊसाची बिले सोसायटीत आली आहेत परंतु विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीची सत्ता आली आहे त्यानी आपल्या जाहिरनाम्यात कर्ज  माफीची घोषणा केली होती कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत. आपण कर्ज भरले व कर्जमाफी झाली तर आपले पैसे वाया जातील म्हनून तडसर ता.कडेगाव  सेवा सहकारी सोसायटीने पिक कर्ज वसुली थांबण्याचा निर्णय मासिक सभेत घेतला आहे सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रविण पवार होते.असा ठराव घेणारी तडसर सोसायटी हि राज्यातील पहिली सोसायटी आहे. यावेळी बोलताना चेअरमन प्रविण पवार म्हणाले की खरिपातील शेतकऱ्यांचा शेतीमाल घरी येणे चालू झाल्यामुळे बँकांनीसुद्धा आपली कर्ज  वसुली सुरू केली आहे. पण, शेतकरी मात्र कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी तसेच विरो...

"पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायतीमध्ये पत्रकारांचा सन्मान"

Image
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ : धनंजय देशमुख.   "पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायतीमध्ये पत्रकारांचा सन्मान" कडेपूर प्रतिनिधी.        समाजात अन्याय होत असल्यास त्याला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतात पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत असतात तरीदेखील पत्रकार निर्भीड व निपक्षपणे आपले कर्तव्य पार पाडत असतात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो असल्याचे प्रतिपादन कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले.       ते कडेगाव नगरपंचायतीच्या सभागृहामध्ये मराठा पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान कार्यक्रमावेळी बोलत होतें यावेळी उपनगराध्यक्ष पै. अमोल डांगे, बांधकाम सभापती विजय गायकवाड, नगरसेवक निलेश लंगडे, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, युवराज राजपूत, हाजी मुक्तार पटेल प्रमुख उपस्थित होते.       पुढे बोलताना देशमुख म्हणाले ६ जानेवारी रोजी बाळशास्त्रीं जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले. त्याचे स्मरण म्हणून आपण हा दिवस दर्पण दिन किंवा पत्रकार ...

तळबीड येथे ग्रामस्थांचा मनोज घोरपडेंना पाठींबा- डॉ. गजानन चिवटे यांच्या नेतृत्वाखाली बैठक

Image
 उंब्रज/प्रतिनिधी     कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज घोरपडे यांना तळबीड येथून जाहीर पाठिंबा देण्यात आला. डॉ. गजानन चिवटे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. कराड उत्तरच्या विकासासाठी  विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांना निवडून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. डॉ.गजानन चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे युवा नेते सागर शिवदास, सुधीर चिवटे, माजी सरपंच हनमंत गायकवाड, माजी सरपंच उत्तम चव्हाण, माजी उपसरपंच संजय चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, भरत चव्हाण राहुल यादव, मनोज चव्हाण, विकास यादव, सागर चव्हाण, सोन्या गायकवाड,शिवाजी सुतार, महादेव साळुंखे, पांडुरंग शिवदास, धनाजी गायकवाड, महेंद्र वाघमारे, शिवाजी कुंभार, दादासो साळुंखे, महादेव गायकवाड, राजेंद्र मानकर, हिंदुराव चव्हाण, राजाराम गायकवाड, संतोष गायकवाड, रवींद्र राऊत, बाळासाहेब साळुंखे,  दीपक कुंभार, दिनकर डेळेकर, शिवाजी गायकवाड व ग्रामस्थ  उपस्थित होते. 

कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर ! संग्राम देशमुख यांना महायु्तीकडून उमेदवारी जाहीर

Image
कडेगाव पलूस मतदार संघात होणार आता काटे की टक्कर !   संग्राम देशमुख यांना भारतीय जनता पार्टी कडून अधिकृत उमेदवारी जाहीर  कडेगाव पलूस मतदारसंघ हा चर्चेचा मतदार संघ आहे याच मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती धर्मामुळे ही जागा शिवसेनेला  सुटली होती यामुळे माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम  यांचे पारंपारिक विरोधक असलेले  देशमुख कुटुंबीय यांनी या निवडणुकीत  आपला उमेदवारी अर्ज भरलेला नव्हता त्यामुळे मागील निवडणूक तशी एकतर्फी झाली होती  असे म्हणणे  वावगे ठरणार नाही मात्र विशेष म्हणजे मागील निवडणुकीमध्ये  शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असलेल्या  संजय विभुते यांच्यापेक्षा  नोटाचा पर्याय  बऱ्याच मतदारांनी  अवलंबला होता, जवळपास वीस हजार एवढे मताधिक्य नोटाला पडले होते तर आमदार विश्वजीत कदम यांना  विक्रमी मतदान पडून ते महाराष्ट्रात विक्रमी मतांनी निवडून आलेले  उमेदवार ठरले होते  दरम्यान आता होणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पार्टी कडून असलेले  संग्राम देशमुख यांना अधिकृत उमेदवारी मिळाल...