कडेगाव मधील मुद्रांक विक्रेत्यांचा मनमानी कारभार | सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
कडेगाव मधील मुद्रांक विक्रेता ( स्टॅम्प वेंडर ) यांचा मनमानी कारभार चालला आहे यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र हैराण झाला आहे गोरगरीब लोकांना ,विद्यार्थ्यांना , शेतकऱ्यांना बँककामी , नोटरी कामी अन्य शासकीय , खासगी किंवा शाळेच्या कामी 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्पची गरज पडत असते पण लोकांनी स्टॅम्प खरेदी साठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत जसे की स्टॅम्प शिल्लक नाही , उद्या या ! अर्थातच बरेच मुद्रांक विक्रेते जे लोक आपल्या स्वत्ताकडे एखादे काम करणार आहेत अशाच लोकांना स्टॅम्प देत आहेत तर 100 च्या स्टॅम्प मागे काही जण 110 रुपये दर आकारत आहेत तर त्याच पद्धतीने 500 च्या स्टॅम्प मागे सुद्धा जास्तीचा दर आकारला जात आहे तर काही स्टॅम्प विक्रेते निष्क्रिय असून ते स्टॅम्प घेत नाहीत त्यामुळे शासनाचा आणि लोकांचा तोटा होत आहे. मुद्रांक विक्रेत्यांवर कारवाई होणार का.. या आधीही अनेक नागरिकांनी मुद्रांक विक्रेत्यांची तोंडी किंवा लेखी तक्रार करूनही प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेत आहे मुद्रांक विक्रेत्या लोकांच्या दुकानात फलक लावलेले असतात त्यामध्ये प्रत्येक मुद्रांक